Asian Games 2023 : ‘आता पुरुषांच्या क्रिकेट संघानेही आशियाई सुवर्ण जिंकावं’ जेमिमाच्या शुभेच्छा 

महिलांच्या पाठोपाठ आता पुरुषांच्या क्रिकेट संघानेही सुवर्ण जिंकावं यासाठी महिला क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. पुरुषांचा संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली आपली आशियाई मोहीम सुरू करत आहे

180
Asian Games 2023 : ‘आता पुरुषांच्या क्रिकेट संघानेही आशियाई सुवर्ण जिंकावं’ जेमिमाच्या शुभेच्छा 
Asian Games 2023 : ‘आता पुरुषांच्या क्रिकेट संघानेही आशियाई सुवर्ण जिंकावं’ जेमिमाच्या शुभेच्छा 

ऋजुता लुकतुके

चीनच्या होआंगझाओ शहरात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताला पहिलं सुवर्ण मिळालं ते क्रिकेटमध्ये आणि ते ही महिलांच्या संघाने मिळवलेलं. अंतिम फेरीत महिलांनी श्रीलंकन संघाचा १९ धावांनी पराभव केला. या कामगिरीमुळे महिला क्रिकेट संघाची तारीफही होतेय आणि खेळाडूही खुश आहेत.

आता पुरुषांच्या संघानेही सुवर्ण पदक जिंकून चाहत्यांचा आनंद द्विगुणित करावा अशी सदिच्छा महिला संघातील सदस्य जेमिमा रॉडरिग्जने व्यक्त केली आहे. २० षटकांच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ११६ धावा केल्या. आणि तितास साधूच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रींलकन संघाला २० षटकांमध्ये आठ बाद ९८ धावांवर रोखलं.(Asian Games 2023)

या विजयानंतर महिला संघातील अनुभवी सदस्य जेमिमा रॉडरिग्जने पत्रकारांशी संवाद साधला. पुरुषांचा संघही होआंगझाओमध्ये पोहोचला आहे. ‘आम्ही पुरुष संघाशी बोललेलो आहोत. त्यांच्याशी गप्पाही मारल्या. त्यांना आम्ही सांगितलं आहे की, आम्ही जिंकलो, आता तुम्ही जिंकून दाखवा,’ असं जेमिमा म्हणाली.

(हेही वाचा-Arpana Flour Mills Fire : निलंगा येथील अपर्णा फ्लोअर मिलला भीषण आग; कोट्यवधींचा माल जळून खाक)

अंतिम सामन्यात जेमिमाने महत्त्वपूर्ण ४२ धावा केल्या. आणि स्मृती मंदानाबरोबर तिने केलेल्या ७३ धावांच्या भागिदारीमुळेच भारतीय संघाने शंभर धावांचा टप्पा ओलांडला. राष्ट्रीय जर्सी घालण्याचा मान मिळणं खूपच रोमांचकारी आहे, असं जेमिमाने सांगितलं. ‘राष्ट्रीय जर्सी घालणं हे आतापर्यंतचं स्वप्न होतं. त्यातच भारतीय जर्सी घालून देशासाठी आशियाई स्तरावर पदक मिळवता आलं, याचा आनंद आता अविस्मरणीय आहे,’ जेमिमाने पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

भारतीय विजयात मोलाचा वाटा उचलणारी तितास साधूनेही भारतीय विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘क्रिकेटमध्ये सुवर्ण जिंकण्याची संधी तुम्हाला नेहमी मिळत नाही. आशियाई स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशामुळे हे शक्य झालं. अशा स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करणं हा अनुभवच विलक्षण होता. रोमांचकारी या एकच शब्दात त्याचं वर्णन मी करू शकते,’ असं साधू म्हणाली.

क्रिकेट खेळाचा समावेश आता ऑलिम्पिकमध्येही व्हावा अशी आशाही महिला खेळाडूंनी व्यक्त केली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.