भारतीय संघाने आशियाी क्रीडास्पर्धांमध्ये पहिल्यांदाच पदकांचं शतक गाठलं. आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. शिवाय लवकरच संघासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करणार असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने शनिवारी सकाळी होआंगझाओ आशियाई क्रीडास्पर्धेत नेपाळला हरवून सुवर्ण पदक जिंकलं आणि भारतीय गोटात एक वेगळाच माहौल तयार झाला.या स्पर्धेतील हे भारताचं १०० वं पदक होतं. आणि त्यामुळे या पदकाचा जल्लोष फक्त कबड्डी संघातच नाही तर भारतीय पथकात पसरला आहे. ( Asian Games 2023)
खेळाडूंना त्यानंतर आणखी एक भेट मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने भारताच्या कामगिरीची दखल घेत कौतुकपर एक ट्विट प्रसिद्ध केलं. आपल्या ट्विटर खात्यावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, ‘आशियाई क्रीडास्पर्धेतील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. खेळाडूंनी १०० पदकांचा टप्पा ओलांडल्यामुळे आम्ही भारतीय आज जल्लोष करत आहोत. ही ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या कामगिरीमुळे आज आमची मान गर्वाने उंच झाली आहे. आणि तुमचं यश प्रेरणादायी आहे. येत्या १० तारखेला स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंसाठी विशेष मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. तेव्हा खेळाडूंशी वैयक्तिक गप्पा मारण्यासाठी मी उत्सुक आहे. (Asian Games 2023)
(हेही वाचा :Asian Games 2023 : भारताची पदकांची शंभरी तर आतापर्यंत मिळाले २५ सुवर्ण)
या संदेशात पंतप्रधानांनी खेळाडूंच्या स्वागतपर मेजवानीची तारीखही जाहीर करून टाकलीय. १० ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या निवासस्थानी खेळाडूंसाठी स्वागत कार्यक्रम होणार आहे. जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी देशाचं नाव उज्ज्वल केल्याचा अभिमान पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेच्या ७१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय पथकाने १०० पदकांचा टप्पा पार केला. यात नेमबाजी आणि ॲथलेटिक्स बरोबरच तिरंदाजीतही भारताला सर्वाधिक पदकं मिळाली. शिवाय यंदा सुवर्ण पदकांची संख्याही वाढली आहे.
A momentous achievement for India at the Asian Games!
The people of India are thrilled that we have reached a remarkable milestone of 100 medals.
I extend my heartfelt congratulations to our phenomenal athletes whose efforts have led to this historic milestone for India.… pic.twitter.com/CucQ41gYnA
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community