चीनमधील होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई खेळामध्ये Asian Games 2023 भारताचा सुवर्ण पदकांचा आलेख चढता आहे. ही संपूर्ण देशासाठी कौतुकाची बाब आहे. आशियाई स्पर्धेच्या सातव्या दिवशी म्हणजेच शनिवार, ३० सप्टेंबर रोजी टेनिस या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळाले आहे. एशियन गेम २०२३ या स्पर्धेमधील मिश्र टेनिसमधील हे पहिले सुवर्ण पदक रुतुजा भोसले आणि रोहन बोपना यांच्या जोडीने भारताला मिळवून दिले आहे.
अधिक माहितीनुसार, Asian Games 2023 स्पर्धेत टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि रुतुजा भोसले यांनी मिश्र टेनिस या क्रीडा प्रकारात तैपेच्या खेळाडूंना हरवत सुवर्ण पदक पटकावले आहे. २ – ६, ६ – ३, आणि १० -४ अशा फरकाने भारताने सामना जिंकला. रुतुजा हिचे वडील संपतराव भोसले हे पोलीस उपअधिक्षक असून त्यांना राज्याच्या गृहविभागाला २ सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.
(हेही वाचा Asian Games 2023 : दुहेरी पदक विजेत्या ऐश्वरी तोमरा ८ वर्षांपूर्वीचा वडिलांचा ‘तो’ निर्णय आज का आठवतोय?)
टेनिसनंतर बॉक्सिंगमध्ये देखील भारताचे पदक निश्चित
टेनिसमध्ये पदक मिळवल्यानंतर आता देशाने बॉक्सिंगमध्ये देखील एक पदक निश्चित केले आहे. प्रीती पवार या खेळाडूने उपांत्यपूर्ण फेरीत प्रवेश केल्याने देशाचे एक पदक निश्चित झाले आहे.
टेनिसमधील सुवर्णपदकामुळे भारताच्या खात्यात आतापर्यंत ९ सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य अशी एकूण ३५ पदकं आहेत.
Join Our WhatsApp Community