-
ऋजुता लुकतुके
सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या बॅडमिंटन दुहेरीतील आघाडीच्या जोडीने आशियाई खेळांमध्ये इतिहास रचला. अंतिम फेरीत मलेशियाचा २१-१८, २१-१६ ने पराभव करत भारतासाठी स्पर्धेतील बॅडमिंटनमधील पहिलं सुवर्ण जिंकलं. बॅडमिंटन या खेळाची लोकप्रियता आशियाई देशांमध्ये सर्वाधिक आहे आणि त्यातही चीन हे या खेळाचं माहेरघर आहे. अशावेळी चीनमध्येच सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय दुहेरी खेळाडूंनी इतिहास रचलाय. आशियाई क्रीडास्पर्धेत भारतासाठी पहिलं बॅडमिंटन सुवर्ण त्यांनी जिंकलं. दक्षिण कोरियाच्या चॉय यू सू आणि किम वॉनहो या जोडीचा त्यांनी दोन सरळ गेममध्ये २१-१८, २१-१६ असा पराभव केला. (Asian Games 2023)
🇮🇳’s Historic Gold in Badminton 🥇🏸@satwiksairaj and @Shettychirag04 soar to victory in the Badminton Men’s Doubles finals, clinching the coveted Gold Medal for the 1️⃣st time ever in the Asian Games history🏆🇮🇳
Their incredible teamwork and unwavering spirit have made India… pic.twitter.com/iRqNLRHTs2
— SAI Media (@Media_SAI) October 7, 2023
(हेही वाचा – Asian Games 2023 : पुरुषांच्या कबड्डी अंतिम सामन्यात अभूतपूर्व गोंधळ, अखेर भारत विजयी घोषित)
भारतीय जोडगोळी खेळातील वेग, चपळता आणि डावपेच यात कुठेही कमी पडली नाही. उपान्त्य सामन्यात त्यांनी मलेशियाच्या ऑल इंग्लंड विजेत्या जोडीचा पराभव केला होता. त्या सामन्यानंतर सात्त्विकसाईराज आणि चिरागला आत्मविश्वास मिळाला असणार. दोघांनी आधीच्या दिवसापासून खेळाला पुढे सुरुवात केल्यासारखी सफाई अंतिम सामन्यातील त्यांच्या खेळात होती. शिवाय या कोरियन जोडीला अलीकडच्या काळात दोघांनी दोनदा दोन गेममध्ये पराभूत केलं होतं आणि त्यातूनही सात्त्त्विक आणि चिरागला बळ मिळालं असणार.
अंतिम सामन्यात दोघांनीही चुका टाळण्याची दक्षता घेतली आणि त्यासाठी रॅली खेळून प्रतिस्पर्ध्यांना थकवण्याची रणनिती आखली. अशा रॅलीनंतर स्मॅशचा जोरदार विजयी फटका मारण्यातही दोघं यशस्वी झाले. आणि तिथेच भारतीय जोडीचा विजय निश्चित झाला. कोरियन प्रतिस्पर्ध्यांनी दोघांच्या शरीराच्या जवळ फटके मारण्याचा प्रयत्न केला. आणि नेटजवळही त्यांना गुंतवून ठेवलं. त्या जोरावर पहिल्या गेममध्ये ११-९ अशी आघाडीही मिळवली. (Asian Games 2023)
पण, कोरियन डावपेच लगेच ओळखून भारतीयांनी त्यांचंच शस्त्र त्यांच्यावर उलटवलं. राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद दोघांना जवळ राहून सूचना देत होते, त्याचाही हा परिणाम असावा. सात्त्विकसाईराजने अंगभूत आक्रमक खेळाला वेळीच मुरड घालून रॅलीवर भर दिला. चिरागनेही आपल्या मनगटी फटक्यांचा सुरेख वापर केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या ऐतिहासिक सुवर्णाबरोबरच सात्त्विकसाईराज आणि चिराग आता जागतिक क्रमवारीत दुहेरीत पहिल्या क्रमांकावर पोहोचतील. पुढच्या मंगळवारी नवीन क्रमवारी जाहीर होईल. (Asian Games 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community