ऋजुता लुकतुके
आशियाई खेळांमध्ये (Asian Para Games 2023) पहिल्यांदाच पदकांची शंभरी पूर्ण केल्यानंतर भारतीय संघ आता आशियाई पॅरालिम्पिक खेळांमध्ये पदकांचं सोनं लुटण्यासाठी सज्ज झाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी अवनी लेखरा आणि सुमित अंतिल या टोकयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या ॲथलीटनी होआंगझाओमध्येही आपलं वर्चस्व कायम राखलं आहे.
भारतासाठी या स्पर्धेची सुरुवात रौप्य पदकाने झाली. भारताचा सहभाग असलेली पहिली कॅनेइंगची स्पर्धा होती. आणि यात प्राची यादवने देशासाठी रौप्य जिंकलं.
Prachi Yadav 🇮🇳 brings the first medal 🥈🇨🇳🥳 for India at the 4th Asian Para Games. #Hangzhou2022 #Hangzhou2022APG #AsianParaGames2022 pic.twitter.com/vfss04FB8g
— Paralympic India 🇮🇳 (@ParalympicIndia) October 23, 2023
आणि त्यानंतर प्राचीचं रौप्य यश शैलेश कुमारने सुवर्ण रंगात बदललं. उंच उडी प्रकारात शैलेशने भारताला पहिलं सुवर्ण जिंकून दिलं. शैलेश कुमारने टी६३ प्रकारात सुवर्ण जिंकलं. तर भारताच्याच मरियप्पनने इथं रौप्य जिंकलं.
Shailesh Kumar wins the first🥇GOLD for India while Mariyappan Thangavelu takes the SILVER 🥈 in men’s high jump T63. #ParaAthletics #AsianParaGames #Hangzhou2022APG @19thAGofficial l @IndianOilcl l @SBI_FOUNDATION l @Media_SAI l @IndiaSports pic.twitter.com/PjL4bu0QcT
— Paralympic India 🇮🇳 (@ParalympicIndia) October 23, 2023
आणि त्यानंतर आला तो क्षण जिथे एकाच प्रकारात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीनही पदकं भारताने जिंकली. पुन्हा एकदा ॲथलेटिक्स प्रकारात भारताला हे यश मिळालं. थ्रो एफ-५१ प्रकारात भारताच्या प्रणव सुर्माला सुवर्ण, धरमवीरला रौप्य आणि अमित सरोहाला कांस्य पदक मिळालं.
More medals coming in from #ParaAthletics in #AsianParaGames #Hangzhou2022 @19thAGofficial @IndianOilcl @SBI_FOUNDATION @IndiaSports pic.twitter.com/WnEwfwf1kn
— Paralympic India 🇮🇳 (@ParalympicIndia) October 23, 2023
नेमबाज अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमित अंतिल यांचा सामनाही आजच होणार आहे. त्यामुळे भारताच्या पदकांच्या संख्येत आणखी भर पडेल असा अंदाज आहे. या पॅरालिम्पिक खेळांमध्ये ४३ देशांचे ४,००० खेळाडू सहभागी होत आहेत. आणि एकूण २२ क्रीडाप्रकारांमध्ये ५४६ सुवर्ण पदकं जिंकण्याची संधी खेळांडूंसाठी आहे.
भारताने आपलं ५४ खेळाडूंचं पथक या स्पर्धेसाठी उतरवलं आहे. आणि यातले ५१ खेळाडू टोकयो पॅरालिम्पिकमध्ये खेळलेले आहेत. त्यांच्या गाठीशी मोठ्या स्पर्धेचा अनुभव असल्यामुळे भारताला पदकाच्या अपेक्षाही मोठ्या आहेत. याआधी २०१८ मध्ये झालेल्या जकार्ता आशिया पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताने १५ सुवर्णांसह ७२ पदकं जिंकली होती.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community