Asian Para Games 2023 : आशियाई पॅरालिम्पिक खेळात भारताचा पदकांचा नवा उच्चांक, आतापर्यंत ८२ पदकं

आशियाई खेळांपाठोपाठ भारतीय पथकाने आशियाई पॅरालिम्पिक खेळांमध्येही पदकांच्या शतकाच्या दिशेनं वाटचाल सुरू ठेवली आहे.

142
Asian Para Games 2023 : आशियाई पॅरालिम्पिक खेळात भारताचा पदकांचा नवा उच्चांक, आतापर्यंत ८२ पदकं

ऋजुता लुकतुके

भारतीय पॅरा ॲथलीटनी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) एक नवीन उच्चांक सर केला. चीनमध्ये होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई पॅरालिम्पिक (Asian Para Games 2023) खेळांमध्ये भारताने आतापर्यंत ८२ पदकं जिंकत आतापर्यंतची सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. २०१८ सालच्या ७२ पदकांचा उच्चांक त्यांनी मोडला आहे. त्याचबरोबर १८ सुवर्ण जिंकत सर्वाधिक सुवर्णही पटकावली आहेत.

त्यामुळे पॅरा ॲथलीटच्या (Asian Para Games 2023) या कामगिरीचं कौतुक होतंय. गुरुवारी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने एकूण १८ पदकं जिंकली. यामध्ये ३ सुवर्ण, ६ रौप्य आणि ८ कांस्य पदकांचा समावेश होता. भारताची एकूण पदकं आता १८ सुवर्ण, २३ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांसह ८२ अशी झाली आहे.

महिलांच्या एकेरी एसएच ६ प्रकारात भारताच्या नित्याने कांस्य पदक जिंकलं, आणि ते देशाचं ७३ वं पदक ठरलं. या कामगिरीनंतर लगेचच क्रीडा प्राधिकरणाने संघाचं कौतुक करणारं एक ट्विट केलं. (Asian Para Games 2023)

(हेही वाचा – TVS Fiero 125 : टीव्हीएस कंपनीची महेन्द्र सिंह धोनीला आवडलेली बाईक तुम्ही बघितली आहे का?)

भारताच्या सिद्धार्थ बाबूने रायफल प्रो एसएच१ प्रकारात सुवर्ण जिंकलं. त्याने एकूण २४७.७ गुण कमावले. या कामगिरीबरोबरच सिद्धार्थने पॅरिस इथं होणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांसाठी थेट प्रवेशही मिळवला आहे. इतर दोन सुवर्ण पदकं (Asian Para Games 2023) ॲथलेटिक्समध्ये मिळाली. शॉर्टपुट प्रकारात सचिन खिल्लारीने सुवर्ण जिंकलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे.

बॅडमिंटन, ॲथलेटिक्स आणि नेमबाजी या खेळात आतापर्यंत भारतीय पथकाने सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. स्पर्धेचे अजून १० दिवस बाकी असल्याने भारतीय पथक या पदकांमध्ये भर घालू शकतो. (Asian Para Games 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.