Asian Shooting Qualifiers : भारताच्या नॅन्सी आणि इलावेनिल यांना एअर रायफल प्रकारात सुवर्ण व रौप्य 

नॅन्सी आणि इलावेनिल या दोघी भारताच्या उगवत्या नेमबाज मानल्या जातात. 

158
Asian Shooting Qualifiers : भारताच्या नॅन्सी आणि इलावेनिल यांना एअर रायफल प्रकारात सुवर्ण व रौप्य 
Asian Shooting Qualifiers : भारताच्या नॅन्सी आणि इलावेनिल यांना एअर रायफल प्रकारात सुवर्ण व रौप्य 
  • ऋजुता लुकतुके

इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आपल्या कामगिरीतील सातत्य तिसऱ्या दिवशीही कायम ठेवलं. १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताला एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळालं. ज्युनिअर गटात विश्वविजेती असलेली नॅन्सी आता सीनिअर गटासाठीही तयार झाल्याचं तिने दाखवून दिलं. (Asian Shooting Qualifiers)

महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात २५२.८ गुणांची कमाई करत तिने सुवर्ण आपल्या नावावर केलं. विशेष म्हणजे सुवर्णासाठी दोन भारतीयांमध्येच चुरस होती. नॅन्सीची साथीदार इलावेनिल २५२.७ गुणांवर राहिली. आणि थोडक्यात तिचं सुवर्ण हुकलं. (Asian Shooting Qualifiers)

खरंतर एअर रायफल प्रकारात भारताला तीनही पदकं जिंकण्याची संधी होती. पण, मेहुली गोष चौथ्या क्रमांकावर राहिली. चीनची शेन युफान कांस्य पदकाची मानकरी ठरली. (Asian Shooting Qualifiers)

(हेही वाचा – ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमरा आणि विराट कोहलीची आगेकूच)

पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या रुद्राक्ष पाटीलला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. २२८.७ गुणांसह तो तिसरा आला. चीनचा मा सिहान २५१.४ गुणांसह अव्वल आला. (Asian Shooting Qualifiers)

नॅन्सीला मिळालेलं सुवर्ण हे भारताला या स्पर्धेत आतापर्यंत मिळालेलं सातवं सुवर्ण होतं. तर भारताला मिळालेल्या एकूण पदकांची संख्या आता १२ झाली आहे. नॅन्सी, इलावेनिल आणि रुंद्राक्षही भारताचे उगवते नेमबाज म्हणून ओळखले जातात. (Asian Shooting Qualifiers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.