- ऋजुता लुकतुके
आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत (Asian TT Championship) भारतीय महिलांनी ऐतिहासिक कामगिरी करत तीन कांस्य पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत आणि मूळातच आशियाई स्तरावर पदक मिळवण्याची भारतीय महिलांची ही पहिलीच वेळ आहे. ऐहिका मुखर्जी, सुतीर्था मुखर्जी यांनी भारतासाठी पहिल्यांदाच दुहेरीत आंतरराष्ट्रीय पदक जिंकलं आहे. दोघी जागतिक क्रमवारीत पंधराव्या क्रमांकावर आहेत. पण, स्पर्धेत त्यांनी सुरुवातच झोकात केली होती. जागतिक अव्वल चिनी जोडीला त्यांनी हरवलं होतं. पण, अखेर उपांत्य फेरीत जपानी जोडी मिवा हरिमोटो आणि मियू किहारा यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.
(हेही वाचा – CM Eknath Shinde: शिंदे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत १९ मोठे निर्णय!)
४-११, ९-११ आणि ८-११ असा तीन सरळ गेममध्ये भारतीय जोडीचा पराभव झाला. पण, तोपर्यंत सुतीर्था आणि ऐहिका यांनी दुहेरीतील कांस्य पदक निश्चित केलेलं होतं. आशियाई विजेतेपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताने मिळवलेलं हे पहिलं पदक ठरलं आहे. टेबल टेनिसमध्ये दक्षिण कोरिया, चीन, मलेशिया हे आशियाई देशच टेबल टेनिसमध्ये (Asian TT Championship) अव्वल आहेत. त्यामुळे आशियाई पदकाची किंमत मोठी आहे.
(हेही वाचा – Women Farmers : शेतांमधून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल: महिला शेतकरी करत आहेत नेतृत्व)
यापूर्वी या स्पर्धेत मनिका बात्रा, ऐहिका मुखर्जी आणि सुतीर्था मुखर्जी यांनी सांघिक स्पर्धेतही भारताला कांस्य पदक जिंकून दिलं होतं. उपान्त्य फेरीत भारतीय महिलांचा जपानकडून पराभव झाला. पण, त्यापूर्वीच त्यांनी पदक निश्चित केलेलं होतं. १९७२ नंतर पहिल्यांदा भारतीय महिलांनी या स्पर्धेत पदकाची कमाई केली. याउलट पुरुषांमध्ये मात्र मानव ठक्कर आणि मनुष शाह यांचा चौथ्या फेरीतच पराभव झाला होता. (Asian TT Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community