-
ऋजुता लुकतुके
भारताच्या सुनील कुमारने आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात ८७ किलो गटात कांस्य जिंकण्याची कामगिरी केली आहे. जॉर्डन इथं झालेल्या या स्पर्धेत सुनीलने कांस्य पदकाच्या लढतीत चीनच्या जियाजिन हुआंगचा पराभव केला. त्यापूर्वी उपांत्य लढतीत त्याचा इराणच्या यासिन याझिदीकडून १-३ असा निसटता पराभव झाला होता. पण, तोपर्यंत सुनीलने स्पर्धेत दमदार कामगिरी केली. यापूर्वी २०१९ मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुनीलने रौप्य जिंकलं होतं. (Asian Wrestling Championship)
स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत सुनीलने तझाकिस्तानच्या सुखरोव अब्दुलखाईवचा १०-१ असा एकतर्फी पराभव केला होता. त्यामुळे सुनीलकडून पदकाची अपेक्षा होतीच. पण, नेमका उपान्त्य लढतीत त्याचा जोर थोडा कमी पडला. शेवटच्या काही मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्याने दोन गुणांची कमाई करत सुनीलला हरवलं. (Asian Wrestling Championship)
(हेही वाचा – Santosh Deshmukh हत्येचा खटला कसा चालणार? सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी दिली महत्त्वाची माहिती)
Sunil Kumar wins🥉in the Greco Roman 87 kg at the Asian Championships, beating Huang Jiaxin 🇨🇳 5-1. First medal for India at the Asian wrestling championships 2025. #wrestling pic.twitter.com/1MpMt7kVxC
— Rambo (@monster_zero123) March 25, 2025
सुनीलखेरिज इतर भारतीय मल्लांना मात्र आशियाई स्तरावर फारसं यश मिळालं नाही. ७७ किलो गटात सागर खाकरनने पात्रता फेरीत चांगली चमक दाखवली. पण, उपउपान्त्य फेरीत यजमान जॉर्डनच्या एमरो सादेहने त्याला १०-० असं सहज हरवलं. पहिल्याच मिनिटाला सादेहने सागरला कोंडीत पकडलं आणि एका डावात ४ गुण वसूल केले. तिथून पुढे सागरचा खेळ घसरला आणि एमरोने सामन्यावर वर्चस्व मिळवत १०-० असा विजय मिळवला. (Asian Wrestling Championship)
बाकी ६३ किलो वजनी गटात उमेश, ५५ किलो वजनी गटात नितीन १३० किलो गटात प्रेम यांचं आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आलं. (Asian Wrestling Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community