- ऋजुता लुकतुके
पुढील वर्षीच्या पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्लीत भरवण्यात येणार आहेत. भारताच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची घटना आहे. कारण, पॅरा असली तरी अजिंक्यपद स्पर्धा भारतात होण्याची ही पहिलीच वेळ असेल. पुढील वर्षी सप्टेंबर २६ ते ऑक्टोबर ५ दरम्यान ही स्पर्धा जवाहरलाल नेहरु स्टेडिअमवर भरवण्यात येईल. तर पॅरा ॲथलेटिक्समधील ग्रँडप्रिक्स दर्जाची एक स्पर्धाही मार्चमध्ये याच ठिकाणी होणार आहे. (Athletics Event in India)
२०२५ मध्ये या स्पर्धेचं २५ वं वर्ष असेल. आणि ॲथलेटिक्समधील या प्रतीष्ठेच्या स्पर्धेचं आयोजन फक्त चौथ्यांदा एखाद्या आशियाई देशात होत असेल. १०० देशांतून जवळ जवळ १००० पॅरा ॲथलीट या स्पर्धेसाठी भारतात येतील. २०२८ च्या लॉस एंजलिस पॅरा ऑलिम्पिक खेळांचं पात्रता कॅलेंडर या स्पर्धेपासूनच सुरू होणार असल्यामुळे स्पर्धेला जगभरातील ॲथलीटचा चांगला प्रतिसाद मिळेल हे उघड आहे. (Athletics Event in India)
📰New Delhi to host 2025 Para Athletics World Championships#ParaAthletics @Paralympics @ParalympicIndia https://t.co/KjYqssQBkF
— Para Athletics (@ParaAthletics) December 19, 2024
भारताने अलीकडेच पॅरिसमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये १७ पदकं जिंकली होती. तर यापूर्वी २०२३ च्या कोबे इथं झालेल्या पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे जागतिक स्तरावर आता पॅरास्पोर्ट्समध्ये भारताची ओळख निर्माण झाली आहे. (Athletics Event in India)
शिवाय देशात पॅरा खेळांचा प्रसार करण्याच्या दृष्टीनेही भारतासाठी ही मोठी संधी आहे. शिवाय भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन २०२९ च्या ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाच्या हक्कांसाठी प्रयत्नशील आहे. तसंच २०३६ च्या ऑलिम्पिकचं आयोजन देशात व्हावं असाही केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनेही आयोजनाचा हा टप्पा महत्त्वाचा आहे. (Athletics Event in India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community