-
ऋजुता लुकतुके
ॲथलेटिक्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणेच बहादूर सिंग सागू यांची वर्णी लागली आहे. ८ वर्षं या पदावर राहिलेल्या आदील सुमारीवाला यांच्याकडून सागू पदभार हातात घेतील. चंदिगडमध्ये मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सागू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. एएफआयच्या सध्याच्या उपाध्यक्ष अंजू बॉबी जॉर्जही या पदासाठी सुरुवातीला उत्सुक होत्या. पण, त्यांनी सभेपूर्वीच शर्यतीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बहादूर सिंग सागू यांनी निवड बिनविरोध झाली. (Athletics Federation President)
(हेही वाचा- Athletics Federation President : बहादूर सिंग सागू ॲथलेटिक्स फेडरेशनचे नवीन अध्यक्ष, ८ वर्षांनंतर आदील सुमारीवाला पायउतार )
५१ वर्षीय सागू हे २००२ च्या बुसान आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक विजेते आहेत. शॉटपूट प्रकारात त्यांनी पदक जिंकलं होतं. तर २००० आणि २००४ च्या ऑलिम्पिकमध्येही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. सध्या ते भारताच्या ॲथलीट आयोगाचे सदस्य आहेत. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ ४ वर्षांचा असेल. (Athletics Federation President)
PASSING THE BATON!!
Asian Games champion in men’s shot put Bahadur Singh was elected new president of AFI (2025 to 2029) in Chandigarh today.@Adille1 #IndianAthletics pic.twitter.com/5S9b3jEtws— Athletics Federation of India (@afiindia) January 7, 2025
आदील सुमारीवाला जागतिक ॲथलेटिक्स परिषदेच्या कार्यकारी समितीत कायम असतील. भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनच्या २०२० च्या निवडणुकीप्रमाणेच आताही सगळ्या जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. संदीप मेहता आता ॲथलेटिक्स फेडरेशनचे सचिव असतील. तर स्टॅनली जोन्स खजिनदार असतील. आदील सुमारीवाला हे ६७ वर्षांचे आहेत. आणि राष्ट्रीय क्रिडाविषयक आचारसंहितेनुसार, ६५ वर्षं पूर्ण केलेला आणि १० काळ संघटनेवर असलेला प्रतिनिधी पुन्हा संघटनेत येऊ शकत नाही. त्यानुसार, सुमारीवाला यांना हे पद सोडावं लागणार होतं. ते २०१२ पासून ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष होते. (Athletics Federation President)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community