प्रिती झिंटाच्या संघात खेळणार शाहरुख खान… असे आहेत आयपीएल- २०२१चे संघ!

चक्क शाहरुखच्या सिनेमांमध्ये सहकलाकार असणा-या प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्स संघाकडून तो खेळणार आहे.

आयपीएल- २०२१ या नव्या हंगामासाठी नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला. यावेळी अनेक नव्या खेळाडूंची आयपीएलच्या आठ संघांमध्ये निवड करण्यात आली आहे. या नवोदित खेळाडूंमध्ये अर्जुन तेंडुलकरचा सुद्धा समावेश असणार आहे, तो या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये आकर्षण ठरला आहे तो म्हणजे शाहरुख खान. शाहरुख खानला आपण अभिनय क्षेत्रातला किंग खान म्हणून ओळखतो. पण आता क्रिकेटमध्ये सुद्धा एका नव्या शाहरुख खानची एंट्री होणार आहे. चक्क शाहरुखच्या सिनेमांमध्ये सहकलाकार असणा-या प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्स संघाकडून तो खेळणार आहे.

हे खेळाडू ठरले महागडे

या मोसमात द.आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस हा खेळाडू आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. युवराज सिंगचा आतापर्यंत सगळ्यात महागडा खेळाडू असण्याचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे. तब्बल १६.२५ करोड रुपयांत त्याला राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या संघात स्थान दिले आहे. तर न्युझीलंडचा खेळाडू काइल जेमीसन याला बॅंगलोर संघाकडून १५ करोड रुपये देऊन समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला सुद्धा १४.२५ करोड रुपयांत बॅंगलोरने आपल्या संघात स्थान दिले आहे. झ्ये रिचर्डसनला पंजाब किंग्स या संघाकडून १४ करोड रुपयांत खरेदी करण्यात आले आहे.

असे आहेत संघ

चेन्नई सुपर किंग्स

फाफ डयू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायडू, एन. जगदीसन (यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा, एमएस धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, सॅम कुर्रान, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, आर. साई किशोर, मिशेल सॅंटनर, इम्रान ताहिर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, एल. एनगीडी, जोश हेजलवुड, केएम आसिफ, मोईन अली, के गौथम, चेतेश्वर पुजारा, एम हरिसंकर रेड्डी, के. भगथ वर्मा, सी. हरी निशांत.

दिल्ली कॅपिटल्स

श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, ख्रिस वोक्स, आर. अश्विन, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे , इशांत शर्मा, अवेश खान, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, लुकमान मेरीवाला, एम सिद्धार्थ, टॉम कुरन, सॅम बिलिंग्ज.

सनराईजर्स हैद्राबाद

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यमसन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी (यष्टीरक्षक), वृध्दिमान साहा (यष्टीरक्षक), प्रियम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, विराट सिंग, मिशेल मार्श, जेसन होल्डर , मोहम्मद नबी, रशीद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बासिल थंपी, जगदीश सुचित, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान.

पंजाब किंग्स

के एल राहुल (कर्णधार व यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसीमरण सिंग, निकोलस पूरण (यष्टीरक्षक), सरफराज खान, दीपक हूडा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, ईशान पोरेल, दर्शन नलकंडे , ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मालन, झ्ये रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरीडिथ, मोइसेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबियन अॅलन, सौरभ कुमार.

कोलकाता नाईट रायडर्स

शुभमन गिल, नितीश राणा, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, रिंकू सिंग, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), इयन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण सीव्ही, कुलदीप यादव, पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन, कमलेश नगरकोटी, शिवम मावी, संदीप वॉरियर, प्रसिध्दा कृष्णा, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंग, बेन कटिंग, व्यंकटेश अय्यर, पवन नेगी.

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी-कॉक (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, अनमोलप्रीत सिंग, आदित्य तरे (यष्टीरक्षक), केरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, राहुल चहर, जयंत यादव, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, धवल कुलकर्णी, मोहसीन खान, अ‍ॅडम मिलने, नथन कुल्टर-नाईल, पियुष चावला, जेम्स नीशम, युधवीर चरक, मार्को जानसेन, अर्जुन तेंडुलकर

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जोश फिलिप (यष्टीरक्षक), एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), पवन देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल सॅम, युजवेंद्र चहल, अ‍ॅडम झंपा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काइल जेमीसन, डॅनियल ख्रिश्चन, सुयश प्रभुदेसाई, के.एस. भरत.

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसन (कर्णधार व यष्टीरक्षक), जॉस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, यशस्वी जयस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तिवाटिया, महिपाल लोमर, श्रेयस गोपाळ, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, अँड्र्यू टाय, जयदेव उनाडकट , कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकरिया, केसी करियप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंह.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here