Aus vs Eng, 1st T20 : ३ चौकार, ३ षटकार मारत ट्रेव्हिस हेडने एका षटकात वसूल केल्या ३० धावा 

Aus vs Eng, 1st T20 : ट्रेव्हिस हेडच्या धडाक्यापुढे इंग्लिश संघ ढेपाळला 

64
Aus vs Eng, 1st T20 : ३ चौकार, ३ षटकार मारत ट्रेव्हिस हेडने एका षटकात वसूल केल्या ३० धावा 
Aus vs Eng, 1st T20 : ३ चौकार, ३ षटकार मारत ट्रेव्हिस हेडने एका षटकात वसूल केल्या ३० धावा 
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी-२० सामन्यात ट्रेव्हिस हेडच्या ५९ धावा आणि ॲडम झंपाचे दोन बळी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर २८ धावांनी मात केली. यात सॅम करनच्या एका षटकांत ट्रेव्हिस हेडने (Travis Head) वसूल केलेल्या ३० धावा हे सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं. हेड आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी ६ षटकांत ८० धावांची सलामी ऑस्ट्रेलियाला करून दिली. यात हेडचा वाटा ५९ धावांचा. डावाच्या पाचव्या षटकांत त्याने सॅम करनच्या सहा चेंडूंवर ४,४,६,६,६, आणि ४ अशी आतषबाजी केली. त्याने ५९ धावा पूर्ण केल्या त्या २३ चेंडूंत. यात त्याने ४ षटकार आणि ६ चौकार लगावले. (Aus vs Eng, 1st T20)

हेडच्या या धडाक्यानंतरही बाकीचे ऑसी फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव २० षटकात १७९ धावांतच सर्वबाद झाला. सलामीवीर मॅथ्यू शॉर्टने ४१ तर मधल्या फळीत जोन इंग्लिसने ३७ धावा केल्या. मिचेल मार्श, स्टॉईनिस, कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेव्ही हे फलंदाज फ्ल़ॉप ठरले. सुरुवातीला १७९ ही धावसंख्या ॲडलेडच्या छोट्या मैदानावर पुरेशी वाटत नव्हती. पण, इंग्लिश डावाची सुरुवातही चांगली झाली नाही. पहिल्या ६ षटकांतच त्यांनी अव्वल ४ फलंदाज गमावले. (Aus vs Eng, 1st T20)

(हेही वाचा- Karnataka मधील मंड्या येथे दर्ग्याजवळ गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक)

 संघाची अवस्था ४ बाद ५२ अशी झाली. तिथून इंग्लिश संघ सावरलाच नाही. पुढचा एकही फलंदाज संघाला तारून नेईल अशी मोठी खेळी रचू शकला नाही. लिअम लिव्हिंगस्टोनने २७ चेंडूंत ३७ धावा करत डाव सावरण्याचा प्रयतन मात्र केला. लिव्हिंगस्टोनने सामन्यात ३ बळी घेत अष्टपैलू कामगिरी केली. पण, इतर इंग्लिश खेळाडू आव्हानाचा मुकाबला करू शकले नाहीत. सॅम करननने १८ आणि जेमी ओव्हरटनने १५ धावा केल्या. पण, तरीही इंग्लिश संघाला शेवटी २८ धावा कमीच पडल्या. त्यांचा अख्खा संघ १९.२ षटकांत १५१ धावांत बाद झाला. ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली. (Aus vs Eng, 1st T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.