-
ऋजुता लुकतुके
क्रिकेटमध्ये विचित्र पद्धतीने खेळाडू बाद होण्याचे प्रकार अनेकदा मैदानात घडले आहेत. पण, यात धावचीत होणं हे सगळ्यात दुर्दैवी. कारण, ही सर्वस्वी फलंदाजाची चूक असते. असाच काहीसा प्रकार किवी फलंदाज आणि कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) बाबतीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडलं. विल्यमसन फॉर्ममध्ये असलेला आणि मोठी धावसंख्या रचणारा फलंदाज आहे. त्यामुळे त्याचं धावण्यातील अपयश न्यूझीलंड संघाला चांगलंच महागात पडलं हे निकालावरून कळलंच. (Aus Vs NZ 1st Test)
शिवाय इथं विल्यमसन बाद झाला तो धावेचा चुकीचा अंदाज घेतल्यामुळे नाही तर दुसऱ्या फलंदाजाशी धावताना टक्कर झाल्यामुळे. त्यामुळे धावचीत होण्याचा हा व्हीडिओही व्हायरल झाला आहे. मिड-ऑफला चेंडू हलक्या हाताने ढकलल्यावर विल्यमसननेच धावेची हाक यंगला दिली. पण, दोघं खेळपट्टीच्या एकाच बाजूने धावायला लागले. दोघाचंही लक्ष चेंडूकडे होतं. एकमेकांकडे त्यांनी पाहिलंच नाही. त्यामुळे मधोमध गेल्यावर दोघांची टक्कर झाली. आणि इथे लबुशेनने अचूक फेक साधून विल्यमसनला धावचीत केलं. (Aus Vs NZ 1st Test)
(हेही वाचा – Mum vs Tn Ranji SF : श्रेयस अय्यरच्या समावेशामुळे मुंबईचा कर्णधार रहाणे खुश)
The pressure is on New Zealand after Kane Williamson was run out – the first time in a Test Match since 2012
@BLACKCAPS v Australia: 1st Test | LIVE on DUKE and TVNZ+ pic.twitter.com/S9itasfaDg— TVNZ+ (@TVNZ) March 1, 2024
विल्यमसन आधी साथीदार यंगला आदळला. आणि या धक्क्यातून सावरत त्याने धावायला पुन्हा सुरुवात केली तर तो गोलंदाज स्टार्कवर आपटला. आणि शेवटी धावचीत झाला. ‘मैदानावर एक मोठा अपघात घडला आहे,’ असं समालोचन करणारा ब्रँडन ज्युलियन म्हणताना आपण ऐकू शकतो. हा अपघात अर्थात, टकरीचा नाही तर धावचीत होण्याचा आहे. (Aus Vs NZ 1st Test)
न्यूझीलंडचा अवस्था २ बाद १७ अशी झाली. आणि त्यातून किवी संघ सावरलाच नाही. पहिल्या डावात संघ १७९ धावांवर सर्वबाद झाला. आणि ऑस्ट्रेलियाला २०३ धावांची मजबूत आघाडी मिळाली. (Aus Vs NZ 1st Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community