Aus Vs NZ Test Record : कॅमेरून ग्रीन आणि हेझलवूड यांची दहाव्या गड्यासाठी विक्रमी भागिदारी

कॅमेरुन ग्रीनने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद १७७ धावा केल्या. 

207
Aus Vs NZ Test Record : कॅमेरून ग्रीन आणि हेझलवूड यांची दहाव्या गड्यासाठी विक्रमी भागिदारी
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेची सुरुवातच सनसनाटी आणि विक्रमाने झाली आहे. ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळण्याची मनिषा बाळगून असलेल्या किवी गोलंदाजांच्या मध्ये या कसोटीत उभी राहिली ती कॅमेरुन ग्रीनची भिंत. आणि त्यातच त्याने जोश हेझलवूडबरोबर दहाव्या गड्यासाठी ११६ धावांची भागिदारी करत न्यूझीलंडसमोर पहिल्या डावांत धावांचा डोंगरच उभा केला आहे. (Aus Vs NZ Test Record)

न्यूझीलंड संघाविरुद्धची दहाव्या गड्यासाठी केलेली ही सर्वोच्च भागिदारी आहे. या आधीचा विक्रम जेसन गिलेस्पी आणि ग्लेन मॅग्रा यांच्या नावावर होता. २००४ मध्ये या दोघांना किवी संघाविरुद्ध दहाव्या गड्यासाठी ११४ धावांची भागिदारी रचली होती. तो विक्रम २० वर्षांनी मोडला. (Aus Vs NZ Test Record)

कॅमेरुन ग्रीनचं हे फक्त दुसरं आंतरराष्ट्रीय शतक आहे. यापूर्वी भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये त्याने शतक झळकावलं होतं. (Aus Vs NZ Test Record)

(हेही वाचा – Shiv Sena MLA disqualification : विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर होणार पुढील आठवड्यात सुनावणी)

१७३ धावांच्या खेळीत ५ षटकार आणि २३ चौकार

२६७ धावांवर ९ गडी बाद झालेले असताना हेझलवूड आणि ग्रीन ही जोडी जमली. आणि दोघांनी ऑस्ट्रेलियन धावसंख्या ३८३ धावांवर नेली. यात हेझलवूडचा वाटा २२ धावांचा. ग्रीनने संयमी डाव खेळताना खराब चेंडूंचा समाचार घेणं सोडलं नाही. आणि १७३ धावांच्या या खेळीत ५ षटकार आणि २३ चौकार लगावले. या दोघांनी किवी गोलंदाजांचा अंत पाहिला. (Aus Vs NZ Test Record)

आणि त्यानंतर हेझलवूडने चेंडूनाही चमक दाखवताना दोन किवी फलंदाजांना बाद केलं. तर नॅथन लियॉनने ४ गडी बाद करत न्यूझीलंडचा पहिला डाव १७९ धावांत गुंडाळला. आता ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला आहे. (Aus Vs NZ Test Record)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.