Aus vs SA Semi Final : विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर २१३ धावांचं आव्हान

148
Aus vs SA Semi Final : विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर २१३ धावांचं आव्हान
Aus vs SA Semi Final : विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर २१३ धावांचं आव्हान
  • ऋजुता लुकतुके

विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१३ धावांचं आव्हान आहे. खराब सुरुवातीनंतर डेव्हिड मिलरच्या शतकामुळे आफ्रिकन संघाने दोनशेची मजल मारली. (Aus vs SA Semi Final)

विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रका आणि ऑस्ट्रेलिया या संघांदरम्यान सुरू आहे आणि नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतलेल्या आफ्रिकन संघाला निर्धारित ५० षटकांत २१२ अशी मजल मारता आली आहे. खरंतर आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. मिचेश स्टार्क आणि जोस हेझलवूड यांनी भेदक गोलंदाजी करून आफ्रिकेचे पहिले चार गडी २४ धावांतच पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. (Aus vs SA Semi Final)

पण, तिथून पुढे डावखुरा डेव्हिड मिलर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर खमकेपणाने उभा राहिला. बवुमा (०), क्विंटन डी कॉक (३), व्हॅन देअर ड्युसेन (६) आणि एडर मार्करम (१०) असे आघाडीचे आणि फॉर्ममध्ये असलेले फलंदाज झटपट बाद झाले असताना आणि खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत असताना डेव्हिड मिलर अजिबात गोंधळून गेला नाही. (Aus vs SA Semi Final)

हेनरिच क्लासेनबरोबर त्याने फटेकेबाजी सुरूच ठेवली आणि गडी बाद होऊनही धावफलक हलता ठेवला. आधी क्लासेन बरोबर त्याने ९५ धावांची भागिदारी रचली आणि त्यानंतर तळाच्या कोएटझीबरोबर आणखी ६२ धावांची भर घालत त्याने आफ्रिकेला दोनशे धावांच्या जवळ आणलं. यात कोएटझीचा वाटा १९ धावांचा. (Aus vs SA Semi Final)

स्वत: मिलरने १०१ धावा केल्या त्या ११६ चेंडूत. ५ षटकार आणि ८ चौकारांच्या सहाय्याने. (Aus vs SA Semi Final)

(हेही वाचा – Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; आता मेट्रोतून आरामदायी प्रवास)

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या हेझलवूड आणि स्टार्क या आघाडीच्या गोलंदाजांनी खेळपट्टीकडून सुरुवातीला मिळालेल्या मदतीचा पूर्ण फायदा उचलला. स्टार्कने ३४ धावांत ३ बळी घेतले. तर पॅट कमिन्सनेही ५१ धावा देत ३ गडी बाद केले. हेझलवूड आणि ट्रेव्हिस हेड यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. (Aus vs SA Semi Final)

ही उपान्त्य लढत जिंकणारा संघ रविवारी १९ नोव्हेंबरला भारताबरोबर अंतिम फेरीत लढेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. (Aus vs SA Semi Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.