- ऋजुता लुकतुके
रविवारचा दिवस क्रिकेटच्या इतिहासात एकूणच सनसनाटी ठरला. हैद्राबादमध्ये इंग्लिश संघाने पहिल्या डावातील १९० धावांची पिछाडी भरून काढत भारतीय संघाचा २८ धावांनी अनपेक्षित पराभव केला. आणि दूर ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेनमध्ये दिवस-रात्र चाललेल्या कसोटीत विंडिज संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव केला. यापैकी विंडिजचा विजय ऐतिहासिक ठरला. कारण, १९९७ नंतर विंडिज संघाने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला हा पहिला कसोटी विजय ठरलाय. (Aus Vs WI 2nd Test)
विजयानंतर विंडिज खेळाडू इतके भारावलेले होते की, त्यांना अश्रू अनावर झाले होते. या अविस्मरणीय विजयाचा शिल्पकार होता चेमार जोसेफ. या कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा ऑस्ट्रेलिया चांगल्या स्थितीत होती. सलामीवीर स्टिव्ह स्मिथ नाबाद होता. आणि दुसऱ्या बाजूला कॅमेरून ग्रीन होता. पण, विंडिजचा नवखा चेमार जोसेफचा इरादाच काही वेगळा होता. (Aus Vs WI 2nd Test)
It’s all over!!!
Shamar Joseph takes SEVEN #AUSvWI pic.twitter.com/fsGR6cjvkj
— cricket.com.au (@cricketcomau) January 28, 2024
खरंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मिचेल स्टार्कचा चेंडू चवड्यावर बसून तो दुखावला होता. फलंदाजी करताना त्याला दुखापतीमुळे डाव अर्धवट सोडावा लागला होता. पण, गोलंदाजी करताना त्याने दुखापत जाणवूही दिली नाही. सलामीचे गोलंदाज अपयशी ठरल्यावर ४५ व्या मिनिटालाच कर्णधार ब्रेथवेटने चेंडू चेमारकडे दिला. आणि त्याने ट्रेविस हेड आणि ग्रिन यांची दांडी गुल केली. (Aus Vs WI 2nd Test)
(हेही वाचा – Ind vs Eng 1st Test : पहिल्या कसोटीमधील धक्कादायक पराभवानंतर कर्णधार रोहित ‘या’ खेळाडूंवर नाराज )
त्यानंतर त्याने मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि ॲलेक्स कॅरी यांचाही काटा काढला. आणि शेवटी जोश हेझलवूडचा बळी टिपत त्याने ऑस्ट्रेलियन डाव संपवलाही. त्याच्या गोलंदाजीतील वेगामुळे त्याने धावाही जास्त दिल्या. पण, याच वेगाने त्याने फलंदाजांना पेचातही पाडलं. (Aus Vs WI 2nd Test)
How good is Test cricket! #AUSvWI
— cricket.com.au (@cricketcomau) January 28, 2024
ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह वॉ एक बाजू लढवत ९१ धावांवर नाबाद राहिला. पण, संघाचा पराभव तो थांबवू शकला नाही. जोसेफ हा गयानातील एका दुर्गम भागातील खेड्यात राहतो. आणि त्याच्या खेड्यात अगदी २०१७ सालापर्यंत इंटरनेटही नव्हतं. क्रिकेटच्या सुविधाही नव्हत्या. पण, हिरा लपून राहात नाही, तसं जोसेफचं झालं आणि अल्पावधीतच त्याने विंडिज संघात स्थान मिळवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे विंडिज संघाला या मालिकेत त्याने १-१ अशी बरोबरी साधून दिली आहे. (Aus Vs WI 2nd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community