Aus vs WI Brisbane Test : विंडिज संघाला २६ वर्षांनंतर जिंकताना पाहून ब्रायन लाराचे डोळेही जेव्हा पाणावले

ब्रिस्बेन कसोटीत विंडिज संघाने ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी सनसनाटी पराभव केला तेव्हा ब्रायन लारा समालोचन कक्षात होता. 

215
Aus vs WI Brisbane Test : विंडिज संघाला २६ वर्षांनंतर जिंकताना पाहून ब्रायन लाराचे डोळेही जेव्हा पाणावले
Aus vs WI Brisbane Test : विंडिज संघाला २६ वर्षांनंतर जिंकताना पाहून ब्रायन लाराचे डोळेही जेव्हा पाणावले
  • ऋजुता लुकतुके

ब्रिस्बेन इथं झालेल्या दिवस-रात्र कसोटीत वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव केला. विंडिज संघाची आताची अवस्था अशी आहे की, त्यांना एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रही होता आलं नव्हतं. एकेकाळी या खेळातील अजेय संघ असलेला विंडिज संघ सध्या पडत्या काळात आहे. देशातील क्रिकेटसाठीच्या सुविधाही कमी झाल्यात. आणि अशावेळी संघ जेव्हा असा दुर्मिळ विजय मिळवतो, तेव्हा माजी दिग्गज खेळाडूंची जी अवस्था होते तीच विंडिजचा स्टार खेळाडू ब्रायन लाराची झाली. (Aus vs WI Brisbane Test)

सामन्याचं समालोचन करण्यासाठी लारा समालोचन कक्षातच बसले होते. आणि २७ वर्षांनंतर त्यांचा राष्ट्रीय संघ ऑस्ट्रेलियाचा पराभव करताना पाहून ते पुढे काही बोलायचंही विसरले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कक्षातील दुसरे एक समालोचक इयन स्मिथ यांनी वातार्कन सुरू ठेवलं. तर लारा यांना ॲडम गिलख्रिस्त यांनी घट्ट मिठी मारली. (Aus vs WI Brisbane Test)

(हेही वाचा – Australian Open 2024 : इटालियन यानिक सिनरचं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद)

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांत गुंडाळला

कसोटीतील पहिल्या डावात विंडिज संघाने २२ धावांची माफक आघाडी घेतली होती. पण, दुसऱ्या डावात विंडिज संघ १९३ धावांत बाद झाल्यानंतर ही कसोटी ऑस्ट्रेलियासाठी सोपी जाईल असाच अंदाज होता. पण, युवा गोलंदाज चेमार जोसेफने ६८ धावांत ८ बळी मिळवत सामन्याचं चित्रच पालटलं. (Aus vs WI Brisbane Test)

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांत गुंडाळला गेला. आणि विंडिज संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली आहे. ताशी १४०-१४५ किमीच्या वेगाने सातत्याने मारा करू शकणारा चेमार जोसेफ क्रिकेट जगतातील नवीन लक्षवेधी खेळाडू ठरला आहे. (Aus vs WI Brisbane Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.