- ऋजुता लुकतुके
मेलबर्नच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला. या सामन्यात कांगारुंचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ, कॅमेरुन ग्रीन आणि इग्निस या तिघांनीही अर्धशतकं झळकावली. त्यामुळे विजयासाठी २३२ धावांचं आव्हान त्यांनी ३९व्या षटकांतच पार केलं. स्मिथ ७७ चेंडूंत ७७ धावा करून नाबाद राहिला. तर कॅमेरुन ग्रीनने ७७ धावा केल्या त्या १०७ चेंडूंत. (Aus vs WI ODI Series)
त्यापूर्वी सलामीवीर इग्लिसने ४३ चेंडूंत घणाघाती ६३ धावा करत ऑस्ट्रेलियाला चांगली पायाभरणी करून दिली होती. विशेष म्हणजे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भारताचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा हा सलग दहावा विजय आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ट्रेव्हिस हेडचं अपयश सोडलं तर ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात सगळं सोपंच गेलं. (Aus vs WI ODI Series)
A commanding victory for Australia!
Check out the final scorecard here #AUSvWI
— cricket.com.au (@cricketcomau) February 2, 2024
दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ २३२ धावांची मजल मारू शकला तो केसी कार्टीच्या ८८ धावांच्या खेळीमुळे. आणि त्याने रोस्टन चेझबरोबर केलेल्या ११० धावांच्या भागिदारीमुळे. या भागिदारीने विंडिंज डावाला आकार दिला. कार्टीचं शतक मात्र थोडक्यात हुकलं. त्याचा साथीदर वॉल्शने एकेरी धाव चोरण्याचा नाहर प्रयत्न केला. आणि नसलेली धाव पळताना कार्टीचा नाहक बळी गेला. नाहीतर त्याने विंडिज संघाला २५० पर्यंतही पोहोचवलं असतं. (Aus vs WI ODI Series)
(हेही वाचा – UlhasNagar Crime : पहा कसा झाला महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर)
कार्टी आणि चेझचा अपवाद वगळता इतर विंडिज फलंदाज ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज झेविअर बार्टलेटच्या गोलंदाजीवर बाद झाले. बार्टलेटने ९ षटकांत १७ धावा देत ४ बळी मिळवले. (Aus vs WI ODI Series)
Player of the match is Xavier Bartlett, on debut! #AUSvWI pic.twitter.com/yVYYVtRj67
— cricket.com.au (@cricketcomau) February 2, 2024
बार्टलेटचा हा पदार्पणाचा सामना होता. पण, त्याचे चेंडू चांगलेच स्विंग होत होते. पहिल्या षटकापासून त्याने विंडिज फलंदाजांना सतावलं. आणि जस्टिन ग्रीव्ह्ज, ॲथनेझ आणि कर्णधार शाई होप यांना लागोपाठच्या षटकांत बाद करत विंडिजची अवस्था ५ षटकांत ३ बाद ५ अशी बिकट करून ठेवली. या कामगिरीसाठी बार्टलेटला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. (Aus vs WI ODI Series)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community