महिला क्रिकेट संघाचे वर्ल्ड कपचे स्वप्न भंगले; ऑस्ट्रेलियासोबत जिंकता जिंकता हरले

121

महिलांचा टी -२० विश्वचषक भारतीयांसाठी आशावादी बनला होता, कारण मानधनाची लयबद्ध खेळी विश्वचषक भारतात येईल, असा विश्वास होता. पण सेमी फायनलच्या वेळी गुरुवारी, २३ फेब्रुवारी रोजी भारतीय संघ जग्ग्जेत्या ऑस्ट्रेलियासोबत जिंकता जिंकता हरला. विशेष म्हणजे नेमके याच सामन्यात मानधना अवघ्या २ धावा करून बाद झाली, त्याआधी शेफाली वर्मा बाद ठरली, मानधना नंतर यास्तिका भाटिया बाद झाली आणि भारतीय महिला संघावर ऑस्ट्रेलियायचे १७२ धावांचे आव्हान पेलणे कठीण बनले तरीही शेवटपर्यंत कर्णधार हरामनप्रीत कौर हिने दावा सावरत जिंकण्याच्या टप्प्यात आणला पण एका बेसावध क्षणी कौर क्रीझच्या जवळ येवून बेसावध राहिली आणि धावबाद झाली, तिथेच भारत संघ हरल्यात जमा झाला आणि तसेच झाले, अवघ्या ५ धावांनी भारतीय महिला क्रिकेट संघ हा सामना हरला आणि भारत विश्व चषकातून बाहेर पडला. 

सेमी फायनलच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाच्या १७३ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात बिकट झाली होती. कारण भारताला दुसऱ्याच षटकात शेफाली वर्माच्या रुपात पहिला धक्का बसला, तिला ९ धावा करता आल्या. त्यानंतर स्मृती मानधना फक्त दोन धावांवर बाद झाली आणि तिसऱ्या षटकात भारताला दुसरा धक्का बसला. त्यानंतर यास्तिका भाटीया फलंदाजीला आली आणि धावचीत होत तिने आत्मघात केला. तिला चार धावांवर समाधान मानावे लागले. यावेळी भारताची बिकट अवस्था झाली होती.

(हेही वाचा पुण्याची निवडणूक वैचारिक लढाई – देवेंद्र फडणवीस)

भारताची ३ बाद २८ अशी अवस्था असताना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर फलंदाजीला आली. आल्यावर लगेचच तिने आक्रमक पवित्रा घेतला. हरमनप्रीतला यावेळी जेमिमा रॉड्रिगेझची चांगली साथ मिळाली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागादारी रचली आणि भारताचा विजयाचा पाया मजबूत केला. हरमनप्रीत आणि जेमिमा यांची जोडी आता भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल, असे वाटत होते. पण यावेळी जेमिमाच्या हातून एक चूक घडली आणि ही जोडी फुटली. जेमिमाने यावेळी २४ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर ४३ धावांची दमदार खेळी साकारली. आक्रमक जेमिमा बाद झाली असली तरी त्यानंतर हरमनप्रीतने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. हरमनप्रीतने त्यानंतर अर्धशतक झळकावले, पण मोक्याच्या क्षणी मात्र ती बाद झाली. हरमनप्रीतने यावेळी ३४ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली. पण ती बाद झाली आणि सामना भारताच्या हातून निसटला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.