Hardik Pandya Injury : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेलाही हार्दिक पांड्या मुकणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी हार्दिक पांड्या उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी सुर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाडकडे संघाचं नेतृत्व जाऊ शकतं.

97
IPL 2024 : हार्दिक पांड्याचा आयपीएल हंगामासाठी फलंदाजीचा सराव सुरू
IPL 2024 : हार्दिक पांड्याचा आयपीएल हंगामासाठी फलंदाजीचा सराव सुरू
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी हार्दिक पांड्या उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी सुर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाडकडे संघाचं नेतृत्व जाऊ शकतं. (Hardik Pandya Injury)

विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला झाल्या झाल्या भारतीय संघ २३ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाबरोबर ५ टी-२० सामन्यांची एक मालिका खेळणार आहे. भारताचा टी-२० संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीतून सावरण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या मालिकेसाठी बदलली कर्णधार म्हणून सुर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाडचा विचार होऊ शकतो. (Hardik Pandya Injury)

भारतीय संघाची निवड मात्र पहिल्या उपांत्य सामन्यानंतरच होईल अशी शक्यता आहे. हा सामना येत्या १५ नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे. हार्दिकच्या तंदुरुस्तीविषयी पीटीआय वृत्तसंस्थेनं बीसीसीआयमधील सूत्रांशी चर्चा केली असता हार्दिक आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच संघात परतेल, असं सूत्रांनी सांगितलं आहे. (Hardik Pandya Injury)

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे आणि टी-२० मालिकेनं या दौऱ्याची सुरुवात होईल. इतकंच नाही तर हार्दिकच्या तंदुरुस्तीचा निर्णय बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील डॉक्टरच घेतील, असंही सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे. (Hardik Pandya Injury)

(हेही वाचा – ICC ODI Ranking : मोहम्मद सिराजला क्रमवारीतील अव्वल स्थान नाही तर ‘ही’ गोष्ट हवीय)

हार्दिक ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार नसेल, तर संघाचा कर्णधार कोण हा प्रश्न आहेच आणि त्यासाठी सुर्यकुमार यादव तसंच ऋतुराज गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. (Hardik Pandya Injury)

विश्वचषक स्पर्धेच्या दीड महिना लांब थकवणाऱ्या वेळापत्रकानंतर विराट कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल हे संघातील प्रमुख खेळाडू विश्रांती घेण्याचीच दाट शक्यता आहे. कारण, त्यानंतर कसोटी मालिका सुरू होणार आहे. अशावेळी टी-२० चा तज्ञ फलंदाज सुर्यकुमारवरच निवड समिती नेतृत्वासाठी विश्वास दाखवू शकते. (Hardik Pandya Injury)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.