किळसवाणं सेलिब्रेशन…ही तर ऑस्ट्रेलियाची परंपराच

161

ख-या अर्थाने विजयाचा आनंद काय असतो हे ऑस्ट्रेलिया संघच सांगू शकेल. पहिल्यांदाच टी-20 विश्वविजेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकावले आहे. त्यामुळे त्यांच्या चेह-यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. पण, सोमवारी आयसीसीने आपल्या ट्विटर अकांऊटवरुन ऑस्ट्रेलियाच्या अनोख्या सेलेब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तुम्ही सुद्धा एकदा हा व्हिडिओ पहाच.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक आणि फलंदाज मॅथ्यू वेड शूजमध्ये बिअर ओतून पित आहे. हा कसला आनंदोत्सव असा प्रश्न लोकांना पडला आहे. आनंद साजरा करण्याचा हा विचित्र व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर ऑस्ट्रेलिया संघावर टीकेची झोड उडाली.

शूई सेलिब्रेशन ही तर परंपरा 

ऑस्ट्रेलियासाठी हे सेलिब्रेशन नवे नाही. गेल्या काही वर्षांपासून जेतेपदानंतर ऑस्ट्रेलियातील खेळाडू असेच सेलिब्रेशन करतात. फॉर्मुला वनपासून क्रिकेटपर्यंत सर्व खेळाडू अशा प्रकारचे सेलिब्रेशन करतात. बूटामध्ये बियर टाकून सेलिब्रेशन करतात त्याला शूई  असे म्हटलं जातं. या सेलिब्रेशनची  सुरुवात जर्मनीमध्ये 18 व्या शतकात झाली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियातही अशाच प्रकारच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. रियाल हॅरीस यानं V8 Utes स्पर्धेत सर्वात आधी शूई सेलिब्रेशन केलं होतं. त्यानंतर अशाच प्रकारचं सेलिब्रेशन V8 सुपरकार स्पर्धा जिंकल्यानंतर डेव्हिड रॅनल्ड्स यानं केलं. त्यानंतर 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात अशाप्रकराच्या सेलिब्रेशनची लाट आली. जॅक मिलर यानं केलेलं शूई सेलिब्रेशन चांगलेच चर्चेत राहिलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फॉर्म्युला वन रेसर (F1)डॅनियल रिकियार्डो यानं या सेलिब्रेशन केलं. त्यानं केलेलं हे फेमस सेलिब्रेशन नंतर ऑस्ट्रेलियात चांगलेच गाजलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू असं सेलिब्रेशन करताना अनेकदा दिसले.

(हेही वाचा अग्निशमन दलासाठी ‘अधिक संरक्षित’ गणवेष! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.