Australian Open 2024 : इटालियन यानिक सिनरचं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद

सिनरने अव्वल मानांकित नोवाक जोकोविचचा पराभव केल्यानंतर अंतिम फेरीत रशियाच्या मेदवेदेवचा ३-६, ३-६, ६-४, ६-४ आणि ६-३ असा पराभव केला. 

274
Australian Open 2024 : इटालियन यानिक सिनरचं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद
Australian Open 2024 : इटालियन यानिक सिनरचं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद
  • ऋजुता लुकतुके

रविवारचा दिवस फक्त क्रिकेटसाठी सनसनाटी नव्हता. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघांनी आपल्यातील सकारात्मक ऊर्जा काही प्रमाणात ऑस्ट्रेलियन ओपनच्या रॉड लेव्हर अरेनातही पाठवली. कारण, इथं इटलीचा यानिक सिनर विजेता ठरला तो पहिले दोन्ही सेट गमावून. ३-६, ३-६ असा पिछाडीवर असताना एकट्या सिनरला वाटलं असेल की, तो जिंकू शकेल. (Australian Open 2024)

सिनरने अलीकडेच डेव्हिस चषकात त्याचा संघ इटलीला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. पण, ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची त्याची पहिली खेप होती. पण, जिगरबाज खेळ करत त्याने पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. तर रशियन डॅनिएल मेदवेदेव अमेरिकन ओपन विजेता आहे. आणि या स्पर्धेतही तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. पण, यावेळीही त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. (Australian Open 2024)

(हेही वाचा – Aus Vs WI 2nd Test : दुसऱ्या कसोटीत विंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय)

यानिक सिनरच्या रुपात २०१४ नंतर पहिल्यांदा नवीन विजेता मिळाला

अंतिम सामन्यात मेदवेदेवने सुरुवात चांगली केली होती. पहिला सेट ६-४ असा जिंकायला त्याला फक्त ३४ मिनिटं लागली. दुसऱ्या सेटमध्येही त्याने दोनदा सिनरची सर्व्हिस भेदली. आणि हा सेटही ४९ मिनिटांत जिंकला. पण, २२ वर्षीय सिनरने हार मानली नाही. पुढच्या २ सेटमध्ये बरोबर दहाव्या गेममध्ये त्याने मेदवेदेवची सर्व्हिस भेदली. आणि हे सेट आरामात जिंकले. (Australian Open 2024)

तर पाचव्या सेटमध्येही त्याने ४-२ अशी आघाडी घेतली. आणि हा सेट ६-३ असा खिशात टाकत त्याने विजेतेपद पटकावलं. स्पर्धेसाठी २०२४ साल महत्त्वाचं ठरलं आहे. कारण, स्पर्धेला २०१४ नंतर पहिल्यांदा नवीन विजेता मिळाला. तोपर्यंत रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच हे तिघंच ही स्पर्धा जिंकत आले आहेत. सिनरने आपल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित नोवाक जोकोविचचा पराभव केला होता. तोच फॉर्म त्याने अंतिम फेरीतही कायम ठेवला. (Australian Open 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.