- ऋजुता लुकतुके
भारताचा वरिष्ठ टेनिसपटू रोहन बोपान्ना आणि त्याची ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडन यांना यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दिसरं मानांकन मिळालं आहे. आणि या जोडीने अपेक्षेप्रमाणे पुरुषांच्या दुहेरीत उपउपान्त्य फेरीत मजल मारली आहे. चौथ्या फेरीत त्यांनी वेस्ली कूलऑफ आणि निकोला मेक्टिक यांचा चुरशीच्या लढतीत ७-६ आणि ७-६ असा पराभव केला. ४३ वर्षीय बोपान्ना जोरकस सर्व्हिसेससाठी ओळखला जातो. आणि विजयात त्याच्या सर्व्हिसेसनी मोठी भूमिका बजावली. (Australian Open 2024)
खरंतर दोन्ही सेटमध्ये सुरुवातीलाच बोपान्ना एबडन जोडीची सर्व्हिस भेदली गेली होती. पण, पहिल्या सेटच्या सातव्या गेममध्ये बोपान्ना आणि एबडन यांनी जोरदार पुनरागमन केलं. बोपान्नाचे बॅकहँड क्रॉसकोर्ट आणि लॉबी शॉट यांच्या जोरावर सातवा गेम दोघांनी जिंकला आणि मग ६-६ अशा बरोबरीनंतर टायब्रेकर अलगद खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्येही सुरुवातीच्या अडथळ्यांनंतर दोघांनी सेटवर वर्चस्व मिळवलं. (Australian Open 2024)
43 yr old Bopanna keeps soaring high ⚡️
Rohan Bopanna & Mathhew Ebden advance into QF of Men’s Doubles at Australian Open.
The 2nd seeded Indo-Australian Express beat 14th seeds Koolhof & Mektic 7-6, 7-6. #AusOpen pic.twitter.com/2MOKVDAKSB
— India_AllSports (@India_AllSports) January 22, 2024
(हेही वाचा – National Bravery Award : नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान)
बोपान्ना आणि एबडन जोडीला विजेतेपदाची आशा
दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीलाच बोपान्नाची सर्व्हिस भेदली गेली होती. पण, त्यानेच नेटजवळ अप्रतिम खेळ करत सामन्यात पुनरागमन केलं. आता बोपान्ना, एबडन जोडीचा मुकाबला अर्जेंटिनाच्या मॅक्झिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोलटेनो या जोडीशी होणार आहे. दुहेरीतील अव्वल जोडी स्पर्धेतून आधीच बाद झाल्यामुळे आता बोपान्ना आणि एबडन जोडीला विजेतेपदाची आशाही आहे. (Australian Open 2024)
विशेष म्हणजे बोपान्ना टेनिस कारकीर्दीतील एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपउपांत्य फेरीत पोहोचल्यामुळे बोपान्ना या आठवड्यात जाहीर होणाऱ्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर जाणार आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा जर बोपान्नाने जिंकली तर तो पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचेल. कारकीर्दीत दुसऱ्या स्थानावर पोहोचणं ही बोपान्नाची आतापर्यंतची सर्वोत्तम क्रमवारी आहे. (Australian Open 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community