-
ऋजुता लुकतुके
भारताच्या सुमित नागलने (Sumit Nagal) ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्या फेरीत सिडेड खेळाडूला नमवण्याची किमया केली आहे. स्पर्धेची दुसरी फेरी तर त्याने गाठलीच. पण, त्यासाठी कझाकिस्तानच्या ॲलेक्झांडर बिबलिक या ३१ व्या सिडेड खेळाडूचा त्याने ६-४, ६-२ आणि ७-६ (७-५) असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला.
२६ वर्षीय सुमित पात्रता स्पर्धेत जिंकून मुख्य ड्रॉमध्ये पोहोचला होता. आणि बिबलिकचं आव्हान त्याच्यासाठी कठीण मानलं जात होतं. पण, २ तास ४० मिनिटांत त्याने हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पहिल्यांदाच सुमितने पहिल्या फेरीचा अडथळा पार केला.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : १५२८ ते २०२४ अयोध्या श्रीराम मंदिराचा ५०० वर्षांचा संघर्ष)
That’s a big win for @nagalsumit 🇮🇳
He takes out No. 31 seed Bublik 6-4 6-2 7-6(5).#AusOpen • #AO2024 pic.twitter.com/ldM9VE4X0M
— #AusOpen (@AustralianOpen) January 16, 2024
२०२१ साली या स्पर्धेत सुमित पहिल्या फेरीतच पराभूत झाला होता. लिथुआनियाच्या रिचर्ड्स बेरन्किसने त्याचा पराभव केला होता. पण, यंदा सुमितचा फॉर्म आणि फटक्यांची निवडही चांगली होती. शिवाय सिडेड खेळाडूबरोबर खेळताना तो गडबडून गेला नाही. इतकंच नाही तर आपल्या व्यावसायिक कारकीर्दीत सुमित फक्त दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी २०२०च्या अमेरिकन ओपनमध्ये त्याने दुसरी फेरी गाठली होती.
The first Indian man in 3️⃣5️⃣ years to beat a seed at a Grand Slam 🇮🇳@nagalsumit • #AusOpen • #AO2024 • @Kia_Worldwide • #Kia • #MakeYourMove pic.twitter.com/SY55Ip4JaG
— #AusOpen (@AustralianOpen) January 16, 2024
सुमित सध्या जागतिक क्रमवारीत १३९ व्या स्थानावर आहे. त्यामुळे त्याची ही कामगिरी लक्षणीयच मानली जाईल. शिवाय ३५ वर्षांत पहिल्यांदा एकेरीत भारतीय खेळाडूने सिडेड खेळाडूचा पराभव केला आहे. यापूर्वी रमेश कृष्णन यांनी १९८९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्येच मॅट विलँडरला हरवलं होतं. त्यानंतर सुमितने अशी कामगिरी केली आहे. आता दुसऱ्या फेरीत सुमितची गाठ चीनच्या युनचेंग शँगशी पडणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community