- ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियन ओपनच्या ज्युनिअर गटात पोलंडच्या १७ वर्षीय टॉमेक बर्केटाने सोमवारी कमाल करताना तब्बल ताशी २३३ किमी वेगाने सर्व्हिस केली आहे. हा एक विक्रम आहे. आणि यंदाच्या स्पर्धेत सर्व विभागांत ही सर्वोत्तम सर्व्हिस आहे. ज्युनिअर गटात बर्केटाला तिसरं मानांकन आहे. आणि दुसऱ्या फेरीत ब्राझीलच्या एंझो कोलमनविरुद्ध खेळताना त्याने ही सर्व्हिस केली. (Australian Open 2024)
गंमत म्हणजे बर्केटाने एवढी तगडी सर्व्हिस करूनही कोलमनने ती परतवलीही. आणि दोन फटक्यांच्या रॅलीनंतर तो गुणही जिंकला. पण, बर्केटाने ७-६, ३-६ आणि ६-२ असा सामन्यात विजय मिळवला. (Australian Open 2024)
PSA: A 17-year-old just hit a 233 km/h serve 😳 🔥
Tomek Berkieta • #AusOpen • #AO2024 pic.twitter.com/kQHD06TFj3
— #AusOpen (@AustralianOpen) January 22, 2024
बर्केटाच्या या सर्व्हिस पूर्वी आतापर्यंतची सर्वोत्तम सर्व्हिस ही अमेरिकेच्या बेन शेल्टनची होती. त्याने गेल्या आठवड्यात ताशी २३१ किमी वेगाने सर्व्हिस केली होती. बर्केटा हा ज्युनिअर गटात उगवता टेनिसपटू म्हणून ओळखला जातो. आणि त्याची तगडी सर्व्हिस तसंच आक्रमक ताकदवान खेळ याच्या जोरावर तो येत्या काही वर्षांत टेनिस विश्व गाजवणार असंही त्याच्याबद्दल बोललं जातं. यापूर्वी डेव्हिस चषक स्पर्धेत तो पोलंडकडून खेळला आहे. (Australian Open 2024)
(हेही वाचा – Sony-Zee Deal Called Off : अखेर सोनीने झी बरोबरचा प्रस्तावित करार मोडला)
दरम्यान पुरुषांच्या मुख्य स्पर्धेत आता उपउपांत्य फेरींच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. (Australian Open 2024)
Four rounds down, three to go 🍿🍿🍿 pic.twitter.com/qghPzCqfHC
— #AusOpen (@AustralianOpen) January 22, 2024
अव्वल सिडेड नोवाक जोकोविचचा मुकाबला १२व्या मानांकित टेलर फ्रीत्झशी होणार आहे. तर दुसरा मानांकित कार्लोस अल्काराझची लढत ऑलिम्पिक चॅम्पियन अलेक्झांडर झ्वेरेवशी होणार आहे. तर आणखी एक महत्त्वाची लढत यानिक सिनर आणि आंद्रे रुबलेव या जागतिक क्रमवारीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळांडूंमध्ये होईल. चौथा उपउपांत्य फेरीचा सामना हर्बर्ट हरकाझ आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यात होईल. (Australian Open 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community