Australian Open 2025 : बहुचर्चित स्पर्धेत नोवाक जोकोविचची कार्लोस अल्काराझवर मात

Australian Open 2025 : जोकोविचला या स्पर्धेत अकरावं विजेतेपद खुणावत आहे. 

32
Australian Open 2025 : बहुचर्चित स्पर्धेत नोवाक जोकोविचची कार्लोस अल्काराझवर मात
  •  ऋजुता लुकतुके

३७ वर्षीय सर्बियन नोवाक जोकोविच यंदा अकराव्या विजेतेपदाच्या निर्धारानेच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत उतरला आहे. आणि हे त्याच्या खेळातूनही दिसत आहे. मंगळवारी झालेल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने २१ वर्षीय कार्लोस अल्काराझचा ४ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ही कामगिरी बजावता त्याने वय हा फक्त आकडा आहे, हेच सिद्ध केलं. जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेवशी त्याचा पुढील फेरीत मुकाबला होईल. (Australian Open 2025)

जोकोविचची मांडी खरंतर दुखावलेली आहे आणि या सामन्यातही तो मांडीला पट्ट्या बांधून उतरला. पहिला सेटही त्याने ४-६ असा गमावला. कोर्टवरील त्याच्या हालचाली तेव्हा पू्‌र्णपणे नियंत्रित वाटत नव्हत्या. जोकोविचची जिद्द मोठी होती. मध्येमध्ये दुखापतीवर उपचार घेत तो ३ तास ४९ मिनिटं खेळला आणि दुसऱ्या सेटपासून त्याने प्रतिस्पर्ध्यावर बाजी पलटवायला सुरुवात केली. त्याचा हा १२ वा उपांत्य फेरीचा सामना असेल. या बाबतीत रॉजर फेडररपेक्षा तो फक्त ३ सामन्यांनी मागे आहे. जेव्हा जेव्हा अल्काराझ सेटवर वर्चस्व मिळवेल असं वाटत होतं, जोकोविचने तगडा खेळ करून त्याला नेस्तनाबूत केलं. असं शेवटच्या तीनही सेटमध्ये घडलं. (Australian Open 2025)

(हेही वाचा – अडीच इंचाचा चाकूचा तुकडा घुसूनही Saif Ali Khan ५ दिवसांत फिट कसा? संजय निरुपम यांचा आरोप)

या विजयानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे ५० उपांत्य फेरी खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर जमा होणार आहे. इथं रॉजर फेडररपेक्षा तो ४ सामन्यांनी वर आहे. दोघांमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस होती. पण, जोकोविचने आपलं वर्चस्व जाऊ दिलं नाही. चौथ्या सेटमध्येही जोकोविचने अल्काराझची पहिलीच सर्व्हिस भेदली आणि त्यानंतर आघाडी कायम राखली. (Australian Open 2025)

जोकोविचचा मुकाबला आता झ्वेरेवशी होणार आहे. तो या स्पर्धेत दुसरा सिडेडे खेळाडू आहे. गेल्यावर्षीही त्याने उपांत्य फेरी गाठली होती. आता उपउपांत्य फेरीत झ्वेरेवने अमेरिकन टॉमी पॉलचा ७-६, ७-६, २-६ आणि ६-१ असा पराभव केला. टेनिसमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी दोघांही ही लढत होती, असा निर्वाळा या सामन्यानंतर झ्वेरेवनेही दिला आहे. दोन पिढ्यांमधील लढत असंही तो म्हणाला. तसंच जोकोविच विरुद्धच्या सामन्यासाठी खास तयारीची गरज असल्याचं मतही त्याने व्यक्त केलं. (Australian Open 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.