-
ऋजुता लुकतुके
यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत अव्वल सिडेड यानिक सिनर आणि दुसरा मानांकीत अलेक्झांडर झ्वेरेव हे आमने सामने येतील. सिनरने उपांत्य फेरीत बेन शेल्टनचा ७-६, ६-२ आणि ६-२ असा पराभव केला. तर दुसऱ्या उपान्त्य सामन्यात अलेक्झांडर झ्वेरेव विरुद्ध जोकोविचला दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. पहिल्या सेटमध्ये सिनरवर दोन सेटपॉईंटने पिछाडीवर पडला होता. पण, स्वत:ला सावरत त्याने हा सेट तर जिंकलाच. शिवाय पुढील दोन आरामात जिंकून फक्त अडीच तासांत हा सामना जिंकला. सामना संपत असताना त्याला पायात पेटकेही येत होते. पण, तात्पुरते उपचार घेऊन त्याने सामना पूर्ण केला. (Australian Open 2025)
Good recovery, @janniksin!#AO2025 pic.twitter.com/Ns5IyDDJok
— #AusOpen (@AustralianOpen) January 24, 2025
सामन्यात सिनरची सुरुवात चांगलीच धिमी होती. दोनदा त्याची सर्व्हिस भेदली गेली होती. आणि तो ५-६ असा पिछाडीवर असताना शेल्टनकडे दोन सेटपॉइंट्स होते. पण, इथेच सामना फिरवण्यात सिनर यशस्वी ठरला. त्याने आधी ६-६ अशी बरोबरी साधली. आणि त्यानंतर टायब्रेकरवरही प्रतिस्पर्ध्याला संधी दिली नाही. हा सेट जिंकल्यावर तर त्याने मागे वळून पाहिलं नाही. ६-२ आणि ६-२ असे उर्वरित सेट जिंकत त्याने अंतिम फेरी गाठली. (Australian Open 2025)
(हेही वाचा- Republic Day Awards 2025: प्रजासत्ताक दिनी ‘शौर्य पुरस्कार’ जाहीर, 942 सैनिकांना सन्मानित करण्यात येणार)
पहिल्या उपांत्य सामन्यात डावा पाय दुखावलेल्या नोवाक जोकोविचला माघार घ्यावी लागली. डाव्या मांडीला भरपूर टेपिंग करून जोकोविच मैदानात उतरला. पण, त्याच्या हालचालींवर परिणाम झाल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. (Australian Open 2025)
Novak Djokovic admits it could be the last time we see him at the #AusOpen 🇦🇺😭 pic.twitter.com/ocd7hDFKHx
— Eurosport (@eurosport) January 24, 2025
झ्वेरेवने या सामन्यात पहिला सेट ७-६ असा जिंकला होता. टायब्रेकरमध्ये जोकोविचला त्रास झाल्याचं दिसलं. आणि काही मिनिटांनंतर त्याने सामना सोडण्याचा निर्णय घेतला. रॉड लेव्हर अरेनावर प्रेक्षकांनी त्याच्यावर दुखापतीचं नाटक केल्याचा आरोप केला. आणि त्यामुळे त्याचा निषेधही करण्यात आला. पण, जोकोविचने शांतपणे मैदान सोडलं. पुढील वर्षी पुन्हा स्पर्धेत खेळण्याचा प्रयत्न करू, असं जोकोविच पत्रकारांशी बोलताना म्हणाला. ३७ वर्षीय जोकोविचने तब्बल १० वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. (Australian Open 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community