-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता स्पर्धेत विजय मिळवत भारताच्या सुमित नागलने (Sumit Nagal) स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला आहे. स्लोवाकियाच्या ॲलेक्स मोलकॅनवर त्याने ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. २ तास ३ मिनिटात नागलने हा सामना जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी असताना मोलकॅनने डबल फॉल्ट केली. आणि तिथून नागलच्या हातात अलगद हा सामना आला.
आता मुख्य ड्रॉमध्ये नागलची गाठ पहिल्या फेरीत कझाकस्तानच्या ३१ व्या क्रमांकावर असलेल्या ॲलेक्झांडर बिबलिकशी पडणार आहे. स्वत: नागल जागतिक क्रमवारीत १३९ व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळवण्याची नागलची ही दुसरी खेप आहे. यापूर्वी २०२१ मध्ये त्याने ही कामगिरी केली आहे.
(हेही वाचा – Atal Setu आजपासून खुला, आता २ तासांच्या प्रवासाला लागणार फक्त २० मिनिटं)
Determined ✊@nagalsumit 🇮🇳 will compete in his second #AusOpen main draw after defeating Alex Molcan 6-4 6-4.
He didn’t drop a set in qualifying. One to watch at #AO2024? 👀 pic.twitter.com/8d5I951FWw
— #AusOpen (@AustralianOpen) January 12, 2024
गेल्यावेळी मात्र पात्रता स्पर्धेत पहिल्याच फेरीत त्याचा पराभव झाला होता. युएस ओपन ही नागलची लाडकी स्पर्धा आहे. आणि तिथे २०१९ आणि २०२० च्या मुख्य स्पर्धेत तो खेळला आहे. यातील २०१९ हंगामात त्याची लढत रॉजर फेडररशी होती. आणि फेडरर विरुद्ध एक सेट जिंकण्याची किमया नागलने केली होती.
तर २०२०च्या हंगामात युएस ओपनमध्ये पहिली फेरी तो जिंकला होता. पण, दुसऱ्या फेरीत त्यावर्षीचा विजेता डॉमनिक थीमने त्याला तीन सेटमध्ये हरवलं होतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community