बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या स्पर्धेला नागपूरामध्ये सुरूवात झाली असून कसोटी मालिकेतील पहिली टेस्ट मॅच भारताने एक डाव राखत जिंकली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव झाला. पहिल्या कसोटीमधील लाजिरवाण्या पराभवानंतर आता १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दिल्ली कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : तुर्कीमध्ये भारतीय व्यावसायिकाचा मृत्यू; टॅटूमुळे पटली ओळख)
दिल्ली कसोटीमध्ये कर्णधार पॅट कमिन्स आणि संघ व्यवस्थापन काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. दिल्ली कसोटी सामन्यात वॉर्नर संघाबाहेर जाऊ शकतो. तसेच ऑस्ट्रेलियन संघ फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
मालिका जिंकणे भारतासाठी आवश्यक
ऑस्ट्रेलियन मीडिया द एजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नागपूर कसोटीमध्ये डेव्हिड वॉर्नर अपयशी ठरल्यानंतर त्याला संघातून वगळण्याचा विचार केला जात आहे. या सामन्यात वॉर्नरने केवळ १० धावा केल्या होत्या. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाला ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये संधी मिळेल की नाही याचे भविष्य ही मालिका निश्चित करणार आहे. ही मालिका जिंकणे भारताला आवश्यक आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही कसोटी मालिका ३-१, ३-०, किंवा २-२ ने जिंकणे आवश्यक आहे.
Join Our WhatsApp Community