Avani Lekhara : पॅरालिम्पिकमध्ये ३ पदकं मिळवणारी पहिली नेमबाज अवनी लेखरा 

Avani Lekhara : १० मीटर एअर रायफल एसएच१ प्रकारात अवनीने सुवर्ण कमावलं 

75
Avani Lekhara : पॅरालिम्पिकमध्ये ३ पदकं मिळवणारी पहिली नेमबाज अवनी लेखरा 
Avani Lekhara : पॅरालिम्पिकमध्ये ३ पदकं मिळवणारी पहिली नेमबाज अवनी लेखरा 
  • ऋजुता लुकतुके

भारताची आघाडीची पॅरा नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) सलग दुसऱ्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णाची कमाई केली आहे. सलग दोन पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवणारी ती पहिली भारतीय नेमबाज आहे. शिवाय पॅरालिम्पिकमध्ये तीन पदकं मिळवणारीही ती पहिली भारतीय आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल एसएच१ प्रकारात अवनीने २४९.७ गुणांची कमाई करत भारताचं या स्पर्धेतील पहिलं सुवर्ण जिंकलं. रौप्य विजेत्या खेळाडूपेक्षा ती तब्बल अडीच गुणांनी पुढे होती.

(हेही वाचा- National Teacher Award : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) या कामगिरीनंतर अवनीचं कौतुक केलं. ‘तिच्या समर्पणाच्या वृत्तीने अवनीने नेहमीच देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे ३ पॅरालिम्पिक पदकं जिंकणारी अवनी ही पहिली भारतीय आहे. तिच्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. अवनीने यंदाही पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकत भारताचं खातं उघडलं आहे,’ या शब्दांत पंतप्रधान मोदींनी अवनीचा गौरव केला. (Avani Lekhara)

 खुद्द अवनी लेखराही (Avani Lekhara) आताच्या कामगिरीने खुश आहे. पण, त्याचबरोबर आणखी दोन स्पर्धा खेळायच्या आहेत याचं भानही तिला आहे. खेळतानाची तिची मानसिकता सांगताना ती म्हणाली, ‘खरंतर अंतिम फेरीत खूप चुरस होती. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पहिले ३ क्रमांक अगदी एकामागून एक होते. तेव्हा मी एकच विचार केला. निकालावर नाही तर नेम साधण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत करायचं. आपल्यामुळे मोठ्या स्पर्धेत राष्ट्रगीत वाजतं, तेव्हा खूपच छान वाटतं. पण, स्पर्धा अजून संपलेली नाही. अजून २ प्रकार बाकी आहेत,’ असं अवनीने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. (Avani Lekhara)

 अवनीची जिद्द मोठी आहे. अकराव्या वर्षी झालेल्या अपघातानंतर ती व्हीलचेअरला खिळली. तरी तिने जिद्दीने नेमबाजीत इथवर मजल मारली आहे. अगदी या पॅरालिम्पिक स्पर्धेपूर्वीही अवनीच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. स्पर्धेपूर्वी तिला सगळ्यातून दीड महिला ब्रेक घ्यावा लागला होता. पण, पॅरालिम्पिक खेळायचंच असा तिचा निर्धार होता. आणि त्याप्रमाणे तिने तयारी सुरू ठेवली. शेवटी हे यश तिला मिळालं आहे. अवनीच्या बरोबरीने तिची साथीदार मोना अगरवालने याच स्पर्धेत कांस्य जिंकलं. त्यामुळे एकाच प्रकारात दोन पदकं जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. (Avani Lekhara)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.