टोकियो पॅरालिम्पिक : अवनी लेखराचा सुवर्ण ‘वेध’! 

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने पहिले सुवर्ण पदक पटकावले. १० मीटर रायफल शूटिंगमध्ये भारताचे नेमबाज अवनी लेखरा हिने सुवर्ण वेध घेतला. तिच्या अचूक नेमबाजीने तिला सोमवारी, ३० ऑगस्ट रोजी सुवर्ण पदक मिळाले.

अवनी हिने रायफल शुटिंगमध्ये ६२१.७ असा स्कोर केला होता. त्यामाध्यमातून जयपूरच्या अवनीने या स्पर्धेच्या पात्रता फेरीत ७ वा क्रमांक पटकावून फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. त्यानंतर तिने फायनलमध्ये कामगिरी उंचावत गोल्ड मेडल पटकावले. भारताने रविवारी टोकयो पॅरालिम्पिकमध्ये मेडल्सची हॅट्रिक केली होती. अवनीने ती कामगिरी पुढे सुरु ठेवत ऐतिहासिक सुवर्ण पदक पटकावले. त्यानंतर अवनीने १०४.९ आणि १०४.८ असा तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत स्कोर केला. अंतिम फेरीत तिने १०४. १ असा स्कोर केला.

पंतप्रधानांकडून अभिनंदन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवनी हिचे अभिनंदन केले. सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल अभिनंदन! तुमच्या अथक परिश्रम घेण्याच्या स्वभावामुळे तुम्ही हे यश प्राप्त केले आहे. हा क्षण भारतीय क्रीडा विश्वासाठी विशेष आहे. तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

भाविनाला रौप्य पदक

रविवारी भारतीय टेबल टेनिसमध्ये भाविना हिने रौप्य पदक मिळवले होते. चीनच्या झोऊ यिंग हिच्यापासून पराभव झाला आणि तिला रौप्य पदकावर समाधान बाळगावे लागले होते. भारताच्या भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टोकियो पॅरालिम्पिक मधले भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाचा 3-0 असा पराभव केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here