Hardik Pandya Injury Update : … तर हार्दिक पांड्या ऐवजी ‘या’ अष्टपैलू खेळाची भारतीय संघात वर्णी

हार्दिक पटेलला वेळेवर आराम मिळाला नाही तर त्याच्या ऐवजी पर्यायी खेळाडू घेण्यावर बीसीसीआय गांभीर्याने विचार करत आहे

183
Hardik Pandya Injury Update : … तर हार्दिक पांड्या ऐवजी ‘या’ अष्टपैलू खेळाची भारतीय संघात वर्णी
Hardik Pandya Injury Update : … तर हार्दिक पांड्या ऐवजी ‘या’ अष्टपैलू खेळाची भारतीय संघात वर्णी
  • ऋजुता लुकतुके

हार्दिक पांड्याला वेळेवर आराम मिळाला नाही तर त्याच्या ऐवजी पर्यायी खेळाडू घेण्यावर बीसीसीआय गांभीर्याने विचार करत आहे. हार्दिक पांड्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला झालेली दुखापत वरवर दिसते त्यापेक्षा मोठी ठरत आहे. दहा दिवसांपूर्वी बांगलादेश संघाविरुद्ध खेळताना त्याचा पाय दुखावला आणि तेव्हापासून त्याने गोलंदाजीची सरावच केलेला नाही. आताही आगामी इंग्लंड तसंच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही, हे स्पष्टच आहे. तर बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेणाऱ्या हार्दिकला दुखापतीतून पूर्ण बरा झाल्याशिवाय तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र देणार नाही, असं तिथल्या डॉक्टरनी संघ प्रशासनाला कळवलं आहे. (Hardik Pandya Injury Update)

अशा परिस्थितीत संघ प्रशासनही हार्दिकला बदली खेळाडू मागायचा का याचा विचार आता करू लागलं आहे. त्यांनी आणि निवड समितीने मिळून काही नावांचा पर्यायही तपासून पाहिला आहे आणि यात आघाडीचं नाव आहे अक्षर पटेल. हार्दिकच्या जागी बदली खेळाडू मागायचा झाला तर तो अक्षर पटेल असण्याची दाट शक्यता आहे. आधी अक्षर भारताच्या संभाव्य विश्वचषक संघात होताच. पण, बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याची विश्वचषकाची बस चुकली आणि त्याच्या जागी अश्विनची संघात वर्णी लागली. पण, आता अक्षरचं नशीब पुन्हा एकदा फळफळू शकतं. आधीच्या दुखापतीतून अक्षर सावरलाय आणि सध्या सुरू असलेल्या मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत तो खेळतोय. अलीकडेच या स्पर्धेत त्याने अर्धशतकही झळकावलंय. त्यामुळे अष्टपैलू म्हणून अक्षरचा विचार नक्कीच होऊ शकतो. (Hardik Pandya Injury Update)

(हेही वाचा – Mumbai Crime : महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मुंबईत खळबळ, हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न )

हार्दिकला बांगलादेश विरुद्ध गोलंदाजी करताना झालेली दुखापत आधी फक्त पाय मुरगळलाय याच स्वरुपाची वाटत होती. पण, हळू हळू त्याची गांभीर्य लक्षात आल्यावर बीसीसीआयने इंग्लंडहून एका फिजिओथेरपिस्टलाही बंगळुरूत बोलावून घेतलं. आता नितीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हार्दिकवर उपचार सुरू आहेत. पण, त्याच्या घोट्याची सूज उतरलेली नाही. याचा अर्थ त्याला लिगामेंट टेअर झालं असावं असा पटेल यांचा अंदाज आहे. आणि त्यांनी तो टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलून दाखवला आहे. अर्थात, बीसीसीआय आणि भारतीय संघ प्रशासनालाही याविषयीचा कुठलाही निर्णय घाईने घ्यायचा नाहीए. ते इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतरच हार्दिकच्या दुखापतीचा अंदाज घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत. पण, भारतीय खेळपट्ट्यांवर प्रभावी ठरू शकेल असा अक्षर पटेल हा एक तगडा पर्याय संघासमोर आहे. शिवाय शिवम दुबे हा तडाखेबाज फलंदाज आणि मध्यमगती मारा करणारा गोलंदाजही असल्यामुळे त्याच्या पर्यायावरही विचार होतो आहे. (Hardik Pandya Injury Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.