- ऋजुता लुकतुके
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) टी-२० प्रकारात सर्वात जलद १०,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. आपल्या २७१ व्या डावांतच त्याने हा टप्पा पार केला. आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला त्याने मागे टाकलं. गेलने २८५ डावांत १०,००० धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीला हा टप्पा गाठण्यासाठी २९९ डाव लागले होते. बाबरने पाकिस्तान सुपर लीग या देशांतर्गत टी-२० स्पर्धेत पेशावर जाल्मी संघाकडून खेळताना हा मापदंड ओलांडला. (Babar Azam)
बुधवारी बाबरला (Babar Azam) १०,००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ६ धावांची गरज होती. कराची किंग्ज विरुद्ध त्याने ७२ धावांची सुरेख खेळी साकारली. आणि त्या दरम्यानच हा विक्रमही पूर्ण केला. (Babar Azam)
#️⃣1️⃣ 😎@babarazam258 notches up the record for 𝐟𝐚𝐬𝐭𝐞𝐬𝐭 𝐭𝐨 1️⃣0️⃣,0️⃣0️⃣0️⃣ 𝐓𝟐𝟎 𝐫𝐮𝐧𝐬 🏅#HBLPSL9 | #KhulKeKhel | #PZvKK pic.twitter.com/fTgQHa0orJ
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 21, 2024
(हेही वाचा – Maratha Reservation : अंजली दमानिया यांचा सरकारवर आरोप; आरक्षण टिकणार नाहीच; आता अजय बावसकरांना उभे केले…)
दोन दिवसांपूर्वी पेशावर झाल्मीचा मुकाबला क्वेट्टा ग्लॅडिएटर्स संघाशी होता. आणि या सामन्यातही त्याने ६८ धावा केल्या. पण, १०,००० धावांसाठी तरीही ६ धावा कमी पडल्या. पण, ती कसर बुधवारी त्याने पूर्ण केली. आणि पेशावर संघाला विजयही मिळवून दिला. टी-२० प्रकारात जागतिक स्तरावर १०,००० धावा करणारे फक्त १३ फलंदाज आहेत. विंडिज सलामीवीर ख्रिस गेल १४,५६२ धावांसह अव्वल स्थानावर आहे. भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० प्रकारात १०,००० च्या वर धावा केल्या आहेत. (Babar Azam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community