Babar Azam Resigns : पाकिस्तानच्या टी-२० संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदी तर कसोटी कर्णधार शान मसूद

पाक कर्णधार बाबर आझमने अखेर विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीची जबाबदारी घेऊन कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तातडीने पाकच्या नवीन कर्णधारांचं नाव घोषित करण्यात आलंय.

168
Babar Azam Resigns : पाकिस्तानच्या टी-२० संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदी तर कसोटी कर्णधार शान मसूद
Babar Azam Resigns : पाकिस्तानच्या टी-२० संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदी तर कसोटी कर्णधार शान मसूद
  • ऋजुता लुकतुके

पाक कर्णधार बाबर आझमने अखेर विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीची जबाबदारी घेऊन कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तातडीने पाकच्या नवीन कर्णधारांचं नाव घोषित करण्यात आलंय. (Babar Azam Resigns)

पाकचा स्टार फलंदाज बाबर आझमने अखेर विश्वचषक स्पर्धेनंतर पाक संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. एकदिवसीय, टी-२० तसंच कसोटी कप्तानीचाही राजीनामा दिल्यानंतर बाबरच्या जागी दोन कर्णधारांची नियुक्तीही तातडीने करण्यात आलीय. विश्वचषक स्पर्धेत पाकचा संघ उपांत्य फेरीपूर्वीच बाद झाला. पण, बाबर आझमच्या कप्तानीखाली संघाने या मोठ्या स्पर्धेपूर्वी आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटाकवलं होतं. (Babar Azam Resigns)

बाबर आझमने राजीनामा दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कसोटी संघाची कप्तानी शान मसूदकडे तर टी-२० प्रकारातील कप्तानी शाहीन आफ्रिदीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण असेल हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. संघाच्या खराब कामगिरीनंतर या दोघांच्या नावाची चर्चा संभाव्य कप्तान म्हणून होतीच. (Babar Azam Resigns)

बाबर आझमने ऑक्टोबर २०१९ पासून पाक संघाचं नेतृत्व केलं होतं आणि पाक संघाला पहिल्यांच आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवून देण्याबरोबरच स्वत: आझमही फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. (Babar Azam Resigns)

पण, विश्वचषक स्पर्धेत आझमही मोठी धावसंख्या रचण्यात अपयशी ठरला. तसंच पाक संघालाही उपांत्य फेरीपूर्वीच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर सुरुवातीला बाबर आझमने कप्तानी सोडणार नसल्याचं सुतोवाच केलं होतं. पण, स्पर्धा संपेपर्यंत त्याच्यावरील दबाव वाढलेला होता. (Babar Azam Resigns)

(हेही वाचा – Bank Strike : बँक कर्मचारी डिसेंबरपासून १३ दिवस संपावर)

शिवाय पाक संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनीही स्पर्धा संपण्यापूर्वीच आपला राजीनामा सुपूर्द केला होता. तर पाक बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी संघात मोठे बदल होणार असल्याचं सुतोवाच केलं होतं आणि कोचिंग स्टाफही बदलणार असल्याचं म्हटलं होतं. (Babar Azam Resigns)

आता मुख्य प्रशिक्षक ग्रँट बॅडबर्न आणि क्रिकेट संचालक मिकी आर्थर यांचं भवितव्यही अधांतरी आहे. बाबर आझमने नवीन कर्णधारांचं स्वागत केलं आहे आणि त्यांना आवश्यक ते सगळं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. (Babar Azam Resigns)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.