…तर बाबर आझम होणार पाकिस्तानचा पंतप्रधान! गावसकरांनी का केले असे भाकीत?

ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना १३ नोव्हेंबरला रविवारी मेलबर्न ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना रंगणार आहे. पाकिस्तान संघाला १४ वर्षानंतर विश्वचषक जिंकण्याची संधी असेल. यानिमित्ताने अनेक योगायोगांची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे. यांचा संदर्भ देत सुनील गावस्कर यांनी एक विशेष टिप्पणी केली आहे.

( हेही वाचा : T20 Final : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान मॅचच्या २४ तास आधी ICC ने केला गेमचेंज; पाऊस पडला तर कोण जिंकणार?)

सुनील गावस्करांनी केले भाकित 

पाकिस्तानला १९९२ मध्ये इम्रान खान यांनी विजेतेपद मिळवून दिले होते तेच २०१८ मध्ये पाकिस्ताने पंतप्रधान बनले त्यामुळे बाबर आझमबाबत भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर म्हणतात, त्याच योगायोगाने पाकिस्तान आता जिंकल्यास बाबर आझम २०४८ मध्ये पाकिस्तानचा पंतप्रधान बनेल. सन १९९२ मधील विश्वचषक सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला होता. त्यावेळी पाकिस्तानला साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने तर यावेळी भारताने पराभूत केले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने मेलबर्न येथील एमजीसीवर खेळले गेले होते.

त्यामुळे तेव्हा १९९२ मध्ये इम्रान खान कर्णधार होते आणि आता बाबर आझम आहे. या दोघांचा वर्ल्डकप स्पर्धेतील प्रवास पाहून आता बाबर आझम पाकिस्तानचा पंतप्रधान बनेल असा तर्क लावण्यात येत आहे. केवळ फॅनच नव्हे, तर भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी सुद्धा हे भाकित केले आहे. पाकिस्तानने वर्ल्ड कप जिंकला तर २०४८ मध्ये बाबर आझम पाकिस्तानचा पंतप्रधान बनू शकतो, असे गावस्कर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here