Badminton Asia Championship : भारतीय पुरुषांचा चीनकडून २-३ ने पराभव 

सात्त्विकसाईराज आणि चिराग या लढतीत खेळले नाहीत, याचा फटका भारतीय संघाला बसला. 

178
Badminton Asia Championship : भारतीय पुरुषांचा चीनकडून २-३ ने पराभव 
  • ऋजुता लुकतुके

मलेशियात सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला चीनकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. लक्ष्य सेन आणि एच एस प्रणॉय यांनी दोन्ही एकेरीच्या लढती जिंकल्या खऱ्या. पण, चीनने दुहेरीच्या दोन्ही लढती जिंकत २-२ अशी बरोबरी साधली. आणि परतीची एकेरी लढत राष्ट्रीय विजेता पण, नवखा चिराग सेन जिंकू शकला नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला. पण, भारताने या स्पर्धेच्या उपउपान्त्य फेरीत आधीच प्रवेश केला आहे. (Badminton Asia Championship)

एकेरीची पहिली लढत एच एस प्रणॉय आणि वेंग हाँग यांग यांच्यात होती. पण, पहिला गेम ६-२१ असा गमावल्यानंतरही प्रणॉयने पुढील दोन गेम २१-१८ आणि २१-१९ असे जिंकत हा सामना जिंकला. प्रणॉयला १६ व्या स्थानावर असलेल्या यांगने चांगली लढत दिली. पण, भारताला १-० अशी आघाडी मिळाली. (Badminton Asia Championship)

(हेही वाचा – Vastad 2024 : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘राज्यस्तरीय वस्ताद २०२४’ स्पर्धेचे आयोजन)

त्यानंतर झालेल्या दुहेरीच्या लढतीत ध्रुव कपिला आणि अर्जुन या जोडीचा १५-२१, २१-१९ आणि १९-२१ असा पराभव झाला. खरंतर ध्रुव आणि अर्जुन यांनी सामन्यात चांगली लढत दिली. पण, मोक्याच्या क्षणी ते सामन्यावर ताबा मिळवू शकले नाहीत. आणि त्यामुळे हातातील सामना त्यांनी गमावला.  (Badminton Asia Championship)

लक्ष्य सेनने मात्र ली लॅन विरुद्धच्या सामन्यात पूर्ण वर्चस्व गाजवलं. ४० मिनिटांत त्याने हा सामना जिंकला. पण, या नंतर भारताने उर्वरित दुहेरी आणि एकेरीतही नवखे खेळाडू उतरवले. आणि त्याचा परिणाम पराभवात झाला. दुहेरीत सूरज गोवाला आणि पृथ्वी कृष्णमूर्ती राव या जोडीला चीनच्या रेन यू आणि शी नान या जोडीने अक्षरश: अर्ध्या तासात १३-२१ आणि ९-२१ असं हरवलं. तर परतीच्या अकेरीत राष्ट्रीय विजेत्या चिराग सेनचाही धुव्वा उडाला. आणि भारताने ही लढत २-३ अशी गमावली. भारताने आधीच बाद फेरीत प्रवेश मिळवलेला असल्याने नवोदित खेळाडूंना संधी देण्याचा भारताचा प्रयत्न होता. आता उपउपांत्य फेरीत भारताची गाठ जपानशी पडेल. (Badminton Asia Championship)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.