- ऋजुता लुकतुके
बॅडमिंटनमधील स्टार दुहेरी जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना येत्या दिवसांत नवीन प्रशिक्षक मिळणार आहेत. मलेशिया किंवा इंडोनेशियन प्रशिक्षकांना बॅडमिंटन असोसिएशनची पसंती असेल, असंही दिसतंय. सध्याचे प्रशिक्षक मथियास बो यांनी पॅरिस ऑलिम्पिकनंतर खाजगी कारणांनी राजीनामा दिला होता. पुढील एका महिन्यात नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती होईल. तोपर्यंत मनू अत्री आणि अरुण विष्णू हे माजी भारतीय खेळाडू सात्त्विक आणि चिरागबरोबर काम करत आहेत. (Badminton Foreign Coach)
‘मलेशिया, इंडोनेशियन आणि इतर काही देशांतून आमच्याकडे काही अर्ज आले आहेत. त्यांची छाननी करून त्यातून योग्य उमेदवार निवडला जाईल. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा किंवा ऑक्टोबरचा पहिला आठवडा झाला की, नवीन प्रशिक्षकाचं नावही जाहीर होईल. प्रशिक्षक परदेशी असतील हे निश्चित आहे,’ असं भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संजय मिश्रा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. (Badminton Foreign Coach)
(हेही वाचा – Chess Olympiad 2024 : भारतीय पुरुषांच्या संघाने जिंकलेला बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा चषक गहाळ)
सात्त्विक आणि चिराग यांच्याकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा होती. पण, पहिल्याच बाद फेरीत त्यांचा पराभव झाला. क्रीडा प्राधिकरण आणि बॅडमिंटन असोसिएशन अशा दोन्ही संस्थांनी बॅडमिंटनपटूंच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. ‘सात्त्विक-चिराग, प्रणॉय, लक्ष्य सेन, सिंधू असे चांगले खेळाडू भारताकडे होते. पण, कामगिरी मनासारखी झाली नाही, हे खरंच आहे. आता इथून पुढची दिशा कशी असेल यावर आम्ही काम सुरू केलं आहे,’ असं मिश्रा म्हणाले. (Badminton Foreign Coach)
प्रणॉय आणि श्रींकात यांची जागा घेण्यासाठी लक्ष्य सेन सज्ज आहे. किरण जॉर्ज आणि प्रियांशू राजावत हे युवा खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत. पण, सिंधू आणि सायनाची जागा घेऊ शकतील अशा महिला एकेरीतील खेळाडू भारतात अजून तयार झालेली नाही. अनमोल खरब आणि मालविका बनसोड यांच्यावर मेहनत घेण्याचा बॅडमिंटन असोसिएशनचा इरादा आहे. (Badminton Foreign Coach)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community