Badminton News : सात्त्विकसाईराज व चिरागने जिंकली थायलंड ओपन स्पर्धा

Badminton News : ऑलिम्पिक पूर्वी भारतीय जोडीने मिळवलेला हा विजय उत्साह वाढवणारा आहे 

161
Badminton News : सात्त्विकसाईराज, चिराग पुरुषांच्या दुहेरीत पुन्हा अव्वल 
Badminton News : सात्त्विकसाईराज, चिराग पुरुषांच्या दुहेरीत पुन्हा अव्वल 
  • ऋजुता लुकतुके

बॅडमिंटनमधील (Badminton News) भारताची आघाडीची दुहेरीतील जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी (Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांनी थायलंड ५०० ओपन स्पर्धेचं दुहेरीतील विजेतेपद पटकावून पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी एक मोठं यश मिळवलं आहे. अंतिम फेरीत त्यांनी चीनच्या चेन बो यांग (Chen Bo Yang) आणि लिउ यी (Liu Yi) या जोडीचा २१-१५ आणि २१-१५ असा थेट गेममध्ये पराभव केला. सामन्यावर पूर्णपणे भारतीय जोडीचंच वर्चस्व दिसून आलं. सात्त्विक आणि चिराग यांनी मिळवेलं हे नववं सुपर सीरिज विजेतेपद आहे. (Badminton News)

(हेही वाचा- IPL 2024, M S Dhoni : बंगळुरू विरुद्धचा सामना हरल्यानंतर धोनी रात्रीच रांचीला का परतला?)

भारतीय जोडीने २०१९ मध्ये आपलं पहिलं सुपर सीरिज विजेतेपदही बँकॉक इथंच जिंकलं होतं. ‘थायलंड ओपन स्पर्धा आमच्यासाठी नेहमीच यशदायी ठरली आहे. बँकॉकमध्येच आम्ही थॉमस चषकही जिंकलो. त्यामुळे इथल्या आठवणी कायमच खास राहतील,’ असं सामन्यानंतर चिराग शेट्टीने बोलून दाखवलं. (Badminton News)

वर्षाच्या सुरुवातीला जागतिक पुरुष दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवल्यानंतर ते राखण्यात भारतीय जोडीला अपयश आलं होतं. कामगिरीत सातत्य त्यांना राखता येत नव्हतं. ऑल इंग्लंड स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पराभव, थॉमस चषकात निसटते पराभव आणि सुपर सीरिजमध्येही विजेतेपदांनी दिलेली हुलकावणी यामुळे मधला काळ या जोडीसाठी कठीण होता. (Badminton News)

(हेही वाचा- Lok Sabha Election Voting : वीर सावरकरांच्या वंशजांनी बजावला मतदानाचा हक्क)

पण, थायलंडमध्ये मात्र सुरुवातीपासून भारतीय जोडीत नेहमीचा आक्रमकपणा दिसला. पहिल्या सामन्यापासून त्यांनी एकही गेम गमावला नाही. आणि अंतिम फेरीतही हा लौकीक कायम राखला. यांग आणि यी जोडीने दोन्ही गेममध्ये सात्त्विक, चिराग जोडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण, मोक्याच्या क्षणी पुन्हा सामन्यावर वर्चस्व मिळवत भारतीय जोडीने अंतिम सामनाही सरळ गेममध्येच जिंकला. (Badminton News)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.