- ऋजुता लुकतुके
राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी पथकाने ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियावर (Bajrang Punia) ४ वर्षांची बंदी लादली आहे. मार्च महिन्याच झालेल्या निवड चाचणी स्पर्धेदरम्यान उत्तेजक चाचणी घ्यायलाच नकार दिल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी एप्रिलपासूनच सुरू होती. २३ एप्रिलला पहिल्यांदा त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेनंही ही कारवाई उचलून धरली होती.
नाडाकडून अधिकृत नोटिस जारी करायला झालेल्या उशिरामुळे ३१ मे ला ही तात्पुरती बंदी हटवण्यात आली. पण, आता कारवाई पूर्ण होऊन ४ वर्षांच्या बंदीचा निर्णय झाला आहे. या कालावधीत पुनिया (Bajrang Punia) कुठलीही आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत स्पर्धा खेळू शकणार नाही आणि प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी निभावू शकणार नाही.
(हेही वाचा – ICC Champions Trophy 2025 : आयसीसी २९ नोव्हेंबरच्या बैठकीत चॅम्पियन्स करंडकावर निर्णय घेण्याची शक्यता)
‘खेळाडू हे प्रकरण सुरू झालं तेव्हापासून म्हणजे २३ एप्रिल २०२४ या तारखेपासून निलंबित आहे. त्यामुळे ही तारीखच कारवाईसाठी गृहित धरण्यात येईल आणि निलंबनाची कारवाई तेव्हापासून पुढे ४ वर्षं लागू होईल,’ असं निकालात म्हटलं आहे. बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि विनेश फोगाट या दोन्ही कुस्तीपटूंनी अलीकडे राष्ट्रीय काँग्रेस पक्षांत प्रवेश केला आहे. बजरंग सध्या किसान काँग्रेसचा अध्यक्षही आहे. ४ मे ला बजरंगने आपल्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात लेखी तक्रार केली होती. त्यावर २० सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबरला सुनावणीही झाली होती.
‘बजरंगने आपली बाजू मांडताना शेतकरी आंदोलनाला दिलेला पाठिंबा, ब्रिजभूषण शरण यांच्याविरोधात केलेलं आंदोलन यामुळे आपल्याला चुकीची वागणूक मिळाल्याचा दावा केला होता. ‘मी उत्तेजक द्रव्य चाचणीसाठी विरोध केला हे खरं आहे. पण, त्याची कारणंही दिली आहेत. वापरण्यात येणारी चाचणीची किट्स ही खूपच जुनी आणि मुदत संपलेली होती. शिवाय सिरिंजही जुनी होती,’ असा दावा बजरंगने (Bajrang Punia) केला होता. नाडाने तो दावा फेटाळला आणि नाडाचं म्हणणं उचलून धरण्यात आलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community