- ऋजुता लुकतुके
बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने यजमानांचा ५ गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडमध्ये बांगलादेशने मिळवलेला हा पहिला विजय. (Ban vs NZ T20)
बांगलादेश संघाचा हा न्यूझीलंड दौरा त्यांना कायम लक्षात राहील असा ठरतोय. न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्ये पहिला एकदिवसीय विजय साकार केल्यानंतर चार दिवसांतच बांगलादेश संघाने आता टी-२० सामन्यातही ५ गडी राखून विजय मिळवलाय. अर्थातच, हा संघाचा न्यूझीलंडमधील पहिला टी-२० विजय आहे. (Ban vs NZ T20)
नेपिअर इथं बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतोनं नाणेफेक जिंकून किवी संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. शोरिफुल इस्लाम आणि अनुभवी महेदी हसन यांनी आपल्या तेज गोलंदाजीने धुमाकूळ घातला. दोघांनी न्यूझीलंडचे पहिले तीन गडी एका धावेतच बाद केले. त्यानंतर डेरिल मिचेलही संघाच्या २० धावा झाल्या असताना तंबूत परतला. या सुरुवातीच्या धक्क्यातून किवी संघ सावरलाच नाही आणि निर्धारित २० षटकांत संघ फक्त १३४ धावाच करू शकला. हे आव्हान बांगलादेशने ५ गडी राखून पार केलं. (Ban vs NZ T20)
Bangladesh Tour of New Zealand
Bangladesh 🆚New Zealand | 1st T20IBangladesh won by 5 wickets & led the series 1-0👏 🇧🇩#BCB | #Cricket | #NZvBAN pic.twitter.com/WrCB7QfCBJ
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 27, 2023
(हेही वाचा – WFI Suspension : कुस्तीचा कारभार ३ सदस्यीय तात्पुरत्या समितीकडे)
खरंतर बांगलादेशच्या डावाची सुरुवातही चांगली नव्हती. तेराव्या षटकात संघाची अवस्था ४ बाद ९४ होती. रॉनी तालुकदार (१०), कर्णधार शांतो (१९), सौम्य सरकार (२२) हे फलंदाज मोठी धावसंख्या न करताच बाद झाले होते. पण, सलामीवीर लिट्टन दासने एक बाजू लढवत नाबाद ४२ धावा केल्या आणि मेहदी हसनने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद १९ धावा केल्या. दास आणि हसन यांच्या सहाव्या गड्यासाठी ४० धावांच्या भागिदारीमुळे हा विजय साध्य झाला. ४ षटकांत १४ धावा देत २ बळी आणि मोक्याच्या क्षणी नाबाद १९ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा मेहदी हसन सामनावीर ठरला. मेहदी हसनला शोरुफुल इस्लामने २६ धावांत ३ बळी टिपत चांगली साथ दिली. बांगलादेश संघाने आता मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (Ban vs NZ T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community