वेस्टइंडीज मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ धडाकेबाज खेळाडूचा संघात समावेश

154

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मायदेशातील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. पुढच्या महिन्यात ६ फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे संघात पुनरागमन झाले आहे. यादवने गेल्या सहा महिन्यांपासून कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. तसेच, ही मालिका खेळण्यासाठी रोहित शर्मा फीट असल्याने, कर्णधार पदाची धूरा रोहित शर्माचं सांभाळणार आहे.

या धडाकेबाज खेळाडूला स्थान 

भारतीय संघाने मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेण्यासाठी, यादववर  विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, फलंदाजीचा विचार केला, तर भारताने बडोद्याचा धडाकेबाज फलंदाज दीपक हुडा याला वनडे संघात स्थान दिले आहे. यासोबतच अंडर-19 क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणारा लेगस्पिनर रवी बिश्नोई याचीही टी-20 मालिकेसाठी पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे.

कसोटी मालिकेचा कर्णधार कोण 

रोहित डिसेंबरमध्ये झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेला भारत रवाना होण्याच्या काही दिवस आधी रोहितला दुखापत झाली होती. रोहितच्या दुखापतीनंतर केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीनंतर आता  रोहित आघाडीवर मानला जात आहे. भारताला मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध पुढील कसोटी सामना खेळायचा आहे. त्यामुळे कसोटी मालिकेचे कर्णधार पदही रोहितला मिळणार का? याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. टी-20 विश्वचषकात खेळलेला हार्दिक पांड्या अजूनही दुखापतग्रस्त आहे.

टी- 20 आणि एकदिवसीय मालिकेचे संघ

बीसीसीआयने नुकतेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेचे ठिकाण बदलले आहे. आता अहमदाबादमध्ये 6, 9 आणि 11 फेब्रुवारीला एकदिवसीय सामने आणि 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला कोलकात्यात टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.

भारत एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान

भारताचा टी-20 संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, हर्षल पटेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.