बीसीसीआय (BCCI) म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारताच्या वरिष्ठ महिला खेळाडूंची नवीन करार यादी जाहीर केली आहे. या नवीन करार यादीत एकूण १७ खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी तीन खेळाडूंचा ए श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
हेही पहा –
बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी २०२२-२३ या वर्षासाठी भारताच्या महिला क्रिकेट खेळाडूंसाठी केंद्रीय करार जाहीर केला आहे. महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त सलामीवीर उपकर्णधार स्मृती मंधाना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना सर्वोच्च ए श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. तर एकूण ५ खेळाडूंना बी श्रेणीत आणि ९ खेळाडूंना सी श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
(हेही वाचा –IPL 2023 : ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी रंगतेय चुरस! टॉप ५ खेळाडू कोण आहेत वाचा…)
बीसीसीआयचे श्रेणीनिहाय मानधन
बीसीसीआय (BCCI) ए श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या महिला खेळाडूंना वार्षिक रिटेनरशिप फी म्हणून ५० लाख रुपये देते. तर बी श्रेणीतील खेळाडूंना ३० लाख रुपये आणि सी श्रेणीतील खेळाडूंना १० लाख इतके रुपये मानधन म्हणून दिले जातात.
🚨 NEWS 🚨: BCCI announces annual player retainership 2022-23 – Team India (Senior Women). #TeamIndia
More Details 🔽https://t.co/C4wPOfi2EF
— BCCI Women (@BCCIWomen) April 27, 2023
श्रेणीनिहाय खेळाडूंची नावे
ए श्रेणी – हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा
बी श्रेणी – रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड
सी श्रेणी – मेघना सिंग, देविका वैद्य, सब्बीनेनी मेघना, अंजली सर्वनी, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल, यास्तिका भाटिया
Join Our WhatsApp Community