टी-20 वर्ल्ड कपः भारतीय संघाची घोषणा! वाचा कोणाला मिळाले संघात स्थान

आगामी आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचा थरार अनुभवण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भारतीय खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे संघाकडून यंदा प्रत्येकाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळए नेमक्या कोणाची संघात वर्णी लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर बीसीसीआयकडून टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या या 15 सदस्यीय संघात आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणा-या वरुण चक्रवर्ती आणि सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आले आहे. तर शिखर धवनला संघातून वगळण्यात आले आहे.

असा आहे संघ

बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये-

 1. विराट कोहली(कर्णधार)
 2. रोहित शर्मा(उपकर्णधार)
 3. के एल राहुल
 4. सूर्यकुमार यादव
 5. रिशभ पंत(यष्टीरक्षक)
 6. इशान किशन(यष्टीरक्षक)
 7. हार्दिक पंड्या
 8. रविंद्र जडेजा
 9. राहुल चहर
 10. आर. अश्विन
 11. अक्षर पटेल
 12. वरुण चक्रवर्ती
 13. जसप्रीत बुमराह
 14. भुवनेश्वर कुमार
 15. मोहम्मद शमी

यांचा संघात समावेश असणार आहे.

यासोबतच दुखापतीतून सावरलेल्या श्रेयस अय्यरला तसेच शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांच्या नावांची स्टँड बाय खेळाडू म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

14 वर्षांपूर्वी टी-20 वर्ल्ड कप उंचावणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंगची या संघाचा मेंटॉर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here