- ऋजुता लुकतुके
बीसीसीआयचा (BCCI) वार्षिक पुरस्कार सोहळा यंदा २३ जानेवारीला हैद्राबाद इथं होणार आहे. याच शहरात २५ जानेवारीपासून भारत वि. इंग्लंड मालिकेतील पहिला कसोटी सामना होणार आहे. त्यापूर्वी दोन दिवस हा पुरस्कार सोहळा होईल. दोन्ही संघ या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कोव्हिडनंतर पहिल्यांदाच बीसीसीआय (BCCI) हा सोहळा आयोजित करत आहे. (BCCI Annual Awards 2023)
बीसीसीआयचा (BCCI) शेवटाच वार्षिक पुरस्कार सोहळा २०१८-१९ हंगामासाठी १३ जानेवारी २०२० साली मुंबईत पार पडला होता. आता तीन वर्षांच्या कालावधीनंतर हा सोहळा होत असल्यामुळे यंदा पुरस्कार विजेत्या खेळाडूंची संख्या पण जास्त असणार आहे. (BCCI Annual Awards 2023)
आधीच्या सोहळ्यात जसप्रीत बुमरा पॉली उम्रीगर या सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी असलेल्या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. तर महिला क्रिकेटमध्ये पूनम यादव सर्वोत्तम ठरली होती. सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कृष्णम्माचारी श्रीकांत आणि अंजुम चोप्रा यांना मिळाला होता. (BCCI Annual Awards 2023)
(हेही वाचा – Passport Ranking: पासपोर्ट क्रमवारीत भारत ८०व्या स्थानी, कोणत्या देशातील नागरिक व्हिसाशिवाय किती देश फिरू शकतात; वाचा सविस्तर)
यांच्यात असणार चुरस
यंदाही पुरस्कार सोहळ्याची जंगी तयारी करण्यात येत आहे. ‘देशातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा गौरव आणि सन्मान करण्याचं व्यासपीठ म्हणून बीसीसीआय या सोहळ्याकडे बघतं. देशातील सगळ्यात लोकप्रिय खेळासाठी खेळाडूंची असलेली मेहनत, प्रेम आणि त्याग यांचं प्रतीक म्हणजे हा पुरस्कार सोहळा आहे. आणि त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याचं भारतीय खेळाडू आणि चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान आहे,’ असं बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी पत्रकात म्हटलं आहे. (BCCI Annual Awards 2023)
नुकताच एकदिवसीय विश्वचषक झाल्यामुळे यंदाच्या सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे. सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी यंदा मोहम्मद शामी (Mohammad Shami), विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांच्यात चुरस असणार आहे. (BCCI Annual Awards 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community