- ऋजुता लुकतुके
बीसीसीआयचे (BCCI Backs Rohit as Captain) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी २०२५ मध्ये होणाऱ्या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये रोहित शर्माच (BCCI Backs Rohit as Captain) भारतीय संघाचा कर्णधार असेल हे रविवारी स्पष्ट केलं आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे. तर २०२४-२५ ची कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही सध्या सुरू आहे. ती संपेपर्यंत रोहितच कर्णधार राहणार हे शाह यांनी स्पष्ट केल्यामुळे रोहित एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार हेच एक प्रकारे त्यांनी सांगितलं आहे. (BCCI Backs Rohit as Captain)
कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत जून महिन्यात इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर होणार आहे. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर रोहितच संघाचं नेतृत्व करेल. (BCCI Backs Rohit as Captain)
(हेही वाचा- Mumbai Rain : पावसामुळे मदत पुनर्वसन मंत्र्यांनाच मदतीची गरज…)
‘रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील वर्षी चॅम्पियन्स करंडक आणि कसोटी अजिंक्यपदही पटकावेल, असा मला विश्वास वाटतो,’ असं जय शाह (Jai Shah) यांनी रविवारी एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत बोलून दाखवलं आहे. एएनआयने रविवारी संध्याकाळी हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात जय शाह यांनी टी-२० विजेतेपदाबरोबरच संघाच्या भविष्यातील काही वाटचालीवरही भाष्य केलं आहे. रोहीत पुढील वर्षी एप्रिल महिन्यात ३८ वर्षांचा होईल. त्यामुळे तो कधी निवृत्त होणार याची कुजबूज मीडियामध्ये होतीच. या मुलाखतीतून जय शाह यांनी एक प्रकारे या चर्चेलाच पूर्णविराम दिला आहे. (BCCI Backs Rohit as Captain)
#WATCH | BCCI Secretary Jay Shah congratulates the Indian cricket team on winning the ICC T20 World Cup
He says, “…I am confident that under the captaincy of Rohit Sharma, we will win the WTC Final and the Champions Trophy…”
(Source: BCCI) pic.twitter.com/NEAvQwxz8Y
— ANI (@ANI) July 7, 2024
‘भारतीय संघाचं टी-२० विजेतेपदासाठी अभिनंदन. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांना हा विजय मी समर्पित करतो. मागच्या एका वर्षातील भारतीय संघाचा हा तिसरा अंतिम सामना होता. पण, यावेळी रोहित आणि त्याच्या संघाने करून दाखवलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शेवटची पाच षटकं निर्णायक ठरली. त्यासाठी मी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah), अर्शदीप (Arshdeep) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचं अभिनंदन करतो. त्यांनी भारताला विजय मिळवून दिला. आता पुढील लक्ष्य असेल ते कसोटी अजिंक्यपद आणि चॅम्पियन्स करंडक,’ असं जय शाह (Jai Shah) यांनी एएनआयवरील या व्हीडिओत बोलून दाखवलं आहे. (BCCI Backs Rohit as Captain)
(हेही वाचा- Raigad Rain : रायगडावर ढगफुटी! मुसळधार पावसामुळे पर्यटक गडावर अडकले, पाहा व्हिडीओ)
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) २०२४ चा टी-२० विश्वचषक खेळणार की नाही अशी चर्चा होती. पण, जय शाह यांनी फेब्रुवारी महिन्यात राजकोटला रोहित आणि विराट खेळणार आणि रोहित संघाचं नेतृत्व करणार असं जाहीर करून टाकलं होतं. आताही शाह यांनी बीसीसीआयसाठी तीच भूमिका निभावली आहे. (BCCI Backs Rohit as Captain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community