BCCI Center of Excellence : बीसीसीआयच्या नवीन क्रिकेट अकादमी सरावासाठी तीन प्रकारच्या खेळपट्ट्या 

BCCI Center of Excellence : क्रिकेट अकादमीला आता सेंटर ऑफ एक्सलेन्स असं नवीन नाव मिळालं आहे 

139
BCCI Center of Excellence : बीसीसीआयच्या नवीन क्रिकेट अकादमी सरावासाठी तीन प्रकारच्या खेळपट्ट्या 
BCCI Center of Excellence : बीसीसीआयच्या नवीन क्रिकेट अकादमी सरावासाठी तीन प्रकारच्या खेळपट्ट्या 
  • ऋजुता लुकतुके 

बंगळुरूत असलेल्या क्रिकेट अकादमीचा आधुनिक अवतार असलेल्या सेंटर ऑफ एक्सेलन्सचं उद्धाटन नुकतंच करण्यात आलं आहे. क्रिकेटच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या या केंद्रात फलंदाजांच्या सरावासाठी तीन मैदानं आहेत. यातील प्रत्येक खेळपट्टी ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वातावरणात खेळण्यासाठी खेळाडू तयार व्हावा अशीच सोय इथं करण्यात आली आहे. शनिवारी बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ वसलेल्या या केंद्राचं उद्घाटन केलं. त्यानंतर रविवारी मीडिया आणि इतर काही लोकांना इथं प्रवेश देण्यात आला. (BCCI Center of Excellence)

(हेही वाचा- Dharavi Masjid Demolition : धारावीतील अनधिकृत मशीद हटवण्याच्या कामाला सुरुवात)

या अख्ख्या संकुलात जिम आणि इनडोअर खेळपट्ट्या, जलतरण तलाव यांच्यासह ३ पूर्ण आकाराची आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट मैदानं आहेत. एकूण ८६ खेळपट्ट्या आहेत. भारतातील फिरकीला पोषक खेळपट्ट्या आणि परदेशातील तेज खेळपट्ट्या अशा कुठल्याही वातावरणात खेळण्यासाठी भारतीय खेळाडूंना सक्षम बनवणं हाच या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. त्याप्रमाणे या खेळपट्ट्यांमध्ये विविधता आहे. (BCCI Center of Excellence)

भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यापूर्वी या केंद्रात सरावाची संधी भारतीय संघाला मिळणार आहे. कारण, इथं लाल मातीच्या १४ खास उसळत्या खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत. ही लाल माती मुंबईहून आणलेली आहे. आणि या मैदानाची सीमारेषा ही तब्बल ८४ यार्ड आहे. तर इतर दोन मैदानांमध्ये ओडिशातील काळी माती आणि कलाहंडी येथील ब्लॅक कॉटन प्रकारची माती असलेल्या एकूण २० खेळपट्ट्या आहेत. याशिवाय इतर ४५ आऊटडोअर नेट्स आहेत. काही इनडोअर क्रिकेट नेट्सही बसवण्यात आली आहेत. (BCCI Center of Excellence)

(हेही वाचा- BCCI AGM : जय शाह यांच्याजागी बीसीसीआयचे नवीन सचिव कोण होणार?)

‘खेळाडूंना कुठल्याही प्रकारच्या वातावरणाशी जुळवून घेता यावं यासाठी विविध प्रकारच्या खेळपट्टयांची योजना करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या सुविधेचा खेळाडूंना नक्की उपयोग होईल,’ असं क्रिकेट केंद्राचे प्रमुख व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. हे केंद्र ४० एकर जागेवर वसलेलं आहे. इथं क्षेत्ररक्षणाच्या सरावासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. काही इनडोअर खेळपट्ट्यांसाठी तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधूनही माती मागवण्यात आली आहे. (BCCI Center of Excellence)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.