BCCI कडून टीम इंडियासाठी खुशखबर! खेळाडूंचा किती वाढणार पगार? विराटसह रोहितला सर्वाधिक फायदा…

147

BCCI लवकरच सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर करणार आहे. या करारानुसार टीम इंडियाचे आजी-माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मोठा फायदा होणार आहे. या दोन्ही खेळाडूंच्या पगारामध्ये भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी BCCI विशेष योजना करत आहे. २०२२ -२०२३ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करारात १० ते २० टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार BCCI कडून करण्यात येत आहे. यामुळे संघातील सिनियर खेळाडूंसह युवा क्रिकेटरलाही फायदा होणार आहे.

( हेही वाचा : देशभरातील स्वच्छतागृहांची माहिती एका क्लिकवर; हे अनोखे अ‍ॅप आहे तरी कसे?)

३ कोटींनी पगार वाढवण्याची शक्यता

BCCI गेल्या ४ वर्षांपासून क्रिकेटपटूंच्या पगारात कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. करार आणि ग्रेडनुसार देण्यात येणाऱ्या रक्कमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता BCCI किमान ३ कोटींनी पगार वाढवण्याची शक्यता आहे. इनसाईड स्पोर्टमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.

ए श्रेणीतील खेळाडूंना १० कोटी पगार? 

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या पगारात २०१७-१८ मध्ये शेवटची वाढ झाली होती. यावेळी ए प्लस श्रेणीची सुरूवात करण्यात आली होती. ए प्लस श्रेणीतील तिन्ही फॉरमॅटमधील खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ७, ५, ३, १ कोटी अशा चार श्रेणी तयार करण्यात आल्या होत्या. इंग्लंडचे खेळाडू भारतीय क्रिकेटपटूंच्या तुलनेत अधिक कमाई करतात. आता ७ कोटींच्या श्रेणीत वाढ करून थेट १० कोटी पगार करण्याचा विचार BCCI कडून सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.