ऋजुता लुकतुके
बीसीसीआयने या आठवड्यात बुधवारी खेळाडूंबरोबर मध्यवर्ती करारांच्या नुतनीकरणाची घोषणा केली ( BCCI Central Contracts) तेव्हापासून दोन नावं मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात गाजतायत. कारण, इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या दोघांना या करारारच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. खरंतर एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आणि त्यानंतरही पाहिलं तर भारतीय संघ व्यवस्थापनाचा या दोघांवर भरवसा होता. आणि अंतिम अकरा जणांत दोघं असूनही करारातून वगळल्यामुळे अचानक असं का झालं, हा चर्चेचा विषय आहे.
(हेही वाचा- Deep Cleaning : मशीद बंदर परिसरात रस्त्यांची सफाई, पण वाढीव आणि अनधिकृत बांधकामांची साफसफाई कधी?)
इशान (Ishan Kishan) आणि श्रेयसने (Shreyas Iyer) रणजी हंगामातील सामन्यांना दांडी मारल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ ओढवली असं बोललं जात आहे. आणि या गृहितकाला पुष्टी मिळेल अशी बातमी समोर आली आहे. दोघांनाही संघ प्रशासनाने रणजी सामने खेळण्याचे निर्देश दिलेले असताना महत्त्वाच्या सामन्यांना त्यांनी दांडी मारल्याचं दिसतंय. ( BCCI Central Contracts)
इशान किशनशी (Ishan Kishan) बीसीसीआयने (BCCI) संपर्कही केला होता. क्रिक-इन्फो या वेबसाईटने यावर बातमी केली आहे. किंबहुना इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतच इशानशी संपर्क झाला होता. आणि तेव्हा आपण कसोटी क्रिकेटसाठी अजून तयार नाही, असं उत्तर इशानने दिल्याचं समजतंय. त्यामुळेच मध्यवर्ती करारासाठी त्याचा विचार झाला नाही, असं आता समजतंय. ( BCCI Central Contracts)
(हेही वाचा- Deep Cleaning : मशीद बंदर परिसरात रस्त्यांची सफाई, पण वाढीव आणि अनधिकृत बांधकामांची साफसफाई कधी?)
डिसेंबर २०२३ मध्ये पहिल्यांदा आफ्रिका दौऱ्यावर असताना इशानने मानसिक थकव्यासाठी सुटी मागितली होती. आणि बीसीसीआयच्या (BCCI) परवानगीने तो दौरा अर्धवट सोडून परतला. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी इशानला झारखंडकडून रणजी खेळण्याचा जाहीर सल्ला दिला होता. पण वेळोवेळी त्याने तो टाळला. ( BCCI Central Contracts)
दुसरीकडे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत खेळत होता. पण, त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी होत नव्हती. त्यामुळे मध्ये असलेल्या १० दिवासांच्या मोठ्या सुटीत त्याला रणजी सामना खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. श्रेयस तेव्हा पाठदुखीची तक्रार करत होता. पण, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या पाहणीत असं कुठलंही दुखणं आढळलं नाही. त्यामुळे आयपीएलसाठी तंदुरुस्त राहता यावं यासाठी तो रणजी खेळत नसल्याचा बीसीसीआयचा समज झाला. त्यामुळे त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. ( BCCI Central Contracts)
बीसीसीआयने (BCCI) पाश आवळल्यावर श्रेयस (Shreyas Iyer) आता मुंबईचा उपान्त्य फेरीचा सामना खेळत आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community