बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आयसीसीमध्ये मोठे पद मिळाले आहे. सौरव गांगुलीची ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयसीसीने बुधवारी दिली. यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी असलेल्या सौरव गांगुलीली आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. यापूर्वी या पदावर भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळे होते. मात्र अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सौरव गांगुलीची नियुक्ती या पदी करण्यात आली आहे.
(हेही वाचा – ‘एसटी’ संपात हस्तक्षेप करून मार्ग काढा! पडळकरांची थेट राज्यपालांकडे मागणी)
BCCI Chair Sourav Ganguly has been appointed to the position of Chair of the ICC Men’s Cricket Committee after Anil Kumble stepped down having served a maximum of three, three-year terms: ICC
(File photo) pic.twitter.com/JIEOHEZ3L0
— ANI (@ANI) November 17, 2021
गांगुली आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रातिनिधित्व करणार
दरम्यान, अनिल कुंबळे यांनी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता आणि आता ते या पदावरून पायउतार झाले आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला जास्तीत जास्त तीन वर्षे या पदाची जबाबदारी सांभाळता येते. त्यामुळे आता अनिल कुंबळे यांच्या जागी सौरव गांगुली यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रातिनिधित्व करण्याचा हा बहुमान प्राप्त झाला आहे.
9 वर्षे ICC क्रिकेट समितीचे कुंबळे अध्यक्ष
अनिल कुंबळे यांनी 2012 मध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती, कुंबळे यांची 2016 मध्ये या पदावर पुन्हा निवड झाली होती. यानंतर 2019 मध्ये तिसऱ्यांदा अनिल कुंबळेची या पदासाठी निवड झाली. अनिल कुंबळे 9 वर्षे ICC क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहेत. तर सौरव गांगुली आतापर्यंत आयसीसीचा निरीक्षक होते.
Join Our WhatsApp Community